💥महाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन देण्याची मागणी...!



💥अशी मागणी महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी केली आहे💥

महाराष्ट्रासह देशातील पर्यटकांना उत्तम सोयी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाची जम्मू-काश्मीर आणि लडाख मध्ये पर्यटन रिसॉर्ट उघडण्याची योजना असून यासाठी केंद्र व संबंधित केंद्रशासित प्रदेशांनी जमीन उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी येथे केली. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या वतीने केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रल्हाद सिंह पटेल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित राज्यांच्या पर्यटन मंत्र्यांच्या राष्ट्रीय संमेलनात श्री. रावल यांनी ही मागणी केली. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे सचिव योगेंद्र त्रिपाठी, विविध राज्यांचे पर्यटन मंत्री, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे संचालक दिलीप गावडे, सहसंचालक धनंजय सावळकर यावेळी उपस्थित होते.श्री रावल म्हणाले, महाराष्ट्र हे विविध क्षेत्रात आघाडीवर आहे. राज्याची हीच ओळख पर्यटन क्षेत्रातही निर्माण व्हावी म्हणून पर्यटन मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पर्यटन रिसॉर्ट उभारण्याची योजना आहे. त्यासाठी केंद्र सरकार व जम्मू काश्मीरच्या राज्यपालांशी प्राथमिक चर्चा झाली असून या रिसॉर्टसाठी जमीन उपलब्ध होण्याबाबत सकारात्मक संकेत मिळाले आहेत. लवकरच यासंदर्भात महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या बैठकीत या रिसॉर्टसाठी निधी उपलब्धतेस मंजुरी देण्यात येणार आहे. अमरनाथ यात्रा, वैष्णोदेवीचे दर्शन व अन्य पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातून पर्यटक आणि भावीक जम्मू काश्मीर व लडाखमध्ये येत असतात पर्यटन रिसॉर्टच्या माध्यमातून पर्यटक व भाविकांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. अशा प्रकारचे पर्यटनरिसॉर्ट सुरु करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरेल, असेही श्री. रावल म्हणाले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या