💥भारतात दहशतवादी कारवायांना खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला आज मोठा धक्का...!



💥दहशतवाद रोखण्यात अपयश,पाकिस्तान काळ्या यादीत💥


आपल्या भूमीवर सातत्याने दहशतवाद पोसणाऱ्या आणि सीमेपलीकडून भारतात दहशतवादी कारवायांना खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला आज मोठा धक्का बसला आहे. आधीच फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (FATF) च्या संशयितांच्या यादीत समावेश असलेल्या पाकिस्तानची एफएटीएफ आशिया पॅसिफिक गटाने काळ्या यादीत रवानगी केली आहे. एपीजीच्या 11 पैकी दहा निकषांची पूर्तता करू  न शकल्याने पाकिस्तानचा काळ्या यादीत समावेश करण्यात आला. एपीजीच्या अंतिम अहवालानुसार पाकिस्तान आपल्या न्यायिक आणि वित्तीय प्रणालीमधील 40 पैकी 32 निकषांची पूर्तता करण्यात अपयशी ठरला आहे. त्याशिवाय दहशतवाद्यांना होणारा वित्तपुरवठा रोखण्यासाठी आवश्यक सुरक्षा यंत्रणेसाठीच्या 11 पैकी 10 निकषांची पाकिस्तानला पूर्तता करता आलेली नाही. आता एफएटीएफच्या 27 सूत्री कार्ययोजनेचा 15 महिन्यांचा अवधी ऑक्टोबरमध्ये समाप्त होत आहेत. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या बैठकीत पाकिस्तानचा समावेश काळ्या यादीत करण्यात येऊ शकतो.  एफएटीएफची बैठक ऑस्ट्रेलियामधील कॅनबेरा येथे होत आहे. दरम्यान, येथे पाकिस्तानसंबंधीचा एक अहवाल सादर झाल्यानंतर स्वीकार करण्यात येणार आहे. तत्पूर्वी पाकिस्तानने बुधवारी एफएटीएफला एक अहवाल सोपवण्यात आला आहे. यामध्ये 27 सूत्री कार्य योजनेचा समावेश आहे. एपीजीने आपल्या तपासात पाहिले की, ''पाकिस्तानच्या दहशतवादाला आळा घालण्यासंदर्भातील प्रयत्नांमध्ये अनेक त्रुटी आहेत. तसेच मनी लाँड्रिंग आणि टेरर फंडिगला रोखण्यासाठी पाकिस्तानकडून सुरू असेलल्या प्रयत्नांमध्येही अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. तसेच 500 बाबतीत सुधारणा केल्याच्या पाकिस्तानच्या दाव्यालाही कुणाकडून पाठिंबा मिळालेला नाही....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या