💥आयएनएक्स प्रकरणातील आरोपपत्रात माझं नाव नाही,२७ तासांनंतर चिदंबरम आले मीडियासमोर...!


💥चिदंबरम यांनी काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली💥


  • आयएनएक्स प्रकरणी अंतरिम जामीन फेटाळल्यानंतर पी. चिदंबरमयांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. मात्र २७ तासांनंतर बेपत्ता झालेलेपी. चिदंबरम यांनी काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना पी. चिदंबरम यांनी आयएनएक्स प्रकरणात मी कधीही आरोपी नव्हतो. माझ्यावर कोणतंही आरोपपत्र दाखल झालं नाही असा दावा केला आहे. यावेळी बोलताना पी. चिदंबरम यांनी सांगितले की, सीबीआय किंवा ईडीने कोणतंही आरोपपत्र दाखल केलेलं नाही, माझा मुलभूत हक्क हिरावला जातोय. मागील २७ तासांपासून अनेक भ्रम पसरविले जात आहेत. मी आणि माझं कुटुंब यात दोषी नाही. कोणत्याही आरोपपत्रात माझं नावनाही. सुप्रीम कोर्टात याबाबत अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे. शुक्रवारी याबाबत सुनावणी होईल. गेल्या २७ तासांत वकिलांसोबत पुढील लढण्याची तयारी करत होतो. रात्रभर कागदपत्रे तयार केली जात होती. तपासयंत्रणांही कायद्याचं पालन केलं पाहिजे असं चिदंबरम यांनी सांगितले..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या