💥वैद्यनाथ कारखान्याने शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे दोन हजार रुपयें हमीभाव द्यावा - प्रा.टी.पी.मुंडे


💥शेतकऱ्यांच्या हक्कासाठी तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.💥

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- .… दि 17

सध्या परळी तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असताना शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे उसाचे पैसे एफ आर पी प्रमाणे 2000 रु 25 ऑगस्ट च्या पूर्वी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने द्यावेत अन्यथा काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा टी पी मुंडे सर यांच्या नेतृत्वाखाली सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.


       परळी तालुक्यात सध्या गेल्या दोन वर्षापासून भीषण दुष्काळी परिस्थिती आहे जनावरांना चारा नाही पिण्याच्या पाण्याचेसुद्धा बिकट संकट शेतकऱ्यांच्या समोर आहे असे असताना शेतकऱ्यांनी उसाची लागवड करून आपला ऊस वैद्यनाथ साखर कारखान्यास दिला परंतु वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने सुरुवातीला चौदाशे रुपयाचा ऊसाचा हप्ता देऊन शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा केली त्यांच्या हक्काचे एफआरपी प्रमाणे पैसे कारखान्याने दिले नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे याच प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा टी पी मुंडे सर यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते त्या  आंदोलनात शेतकऱ्यांना एफआरपी प्रमाणे दोन हजार रुपये हमीभाव द्यावा अशी मागणी घेऊन काँग्रेसने भव्य रस्ता रोको आंदोलन केले होते.


     शेतकऱ्यांनी आपल्या पोटाला चिमटा घेऊन दुष्काळी परिस्थितीमध्ये उसाचे पीक घेतले त्याची जोपासना केली मात्र शेतकऱ्याचा घामाला कारखान्याकडून कसल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही गेल्या आठ ते दहा महिन्यापासून शेतकऱ्यांचे उसाचे पैसे कारखान्याने दिले नाहीत स्वतःला शेतकऱ्यांचे तारणहार समजणाऱ्या कारखान्याच्या चेअरमन यांनी शेतकऱ्याचे घामाचे पैसे अजून पर्यंत का दिले नाहीत ? असा सवाल प्रा टी पी मुंडे सर यांनी उपस्थित केला आहे.


    सरकारच्या नियमानुसार एफआरपी प्रमाणे उसाचे पैसे शेतकऱ्यांना पंधरा दिवसाच्या आत देणे बंधनकारक असताना मात्र कारखान्याचे चेअरमन यांनी सरकारी नियम धाब्यावर बसवले त्याचा गैरवापर केला आणि बळीराजाला दुष्काळात मदतीचा हात देण्याऐवजी त्याची चेष्टा केली याचा जाब शेतकरी विचारल्याशिवाय राहणार नाहीत याची किंमत कारखान्याच्या चेअरमन यांना भोगावी लागेल म्हणून शेतकऱ्याचा अंत पाहू नका अन्यथा कारखान्याच्या चेअरमन तथा ग्रामविकास मंत्री यांना रस्त्यावर फिरू दिले जाणार नाही असा इशारा काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा.टी.पी.मुंडे सर यांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या