💥वाशिम पोलीस दलाने जोपासली सामाजिक बांधिलकी...! 💥पोलीस अधिकारी व कर्मचारी बांधवांनी केले सामूहिक रक्तदान💥

फुलचंद भगत

वाशिम दि.१६ - स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांच संरक्षण करणारे पोलीस आपण बघितले, मात्र गोरगरीब रुग्णांना मोफत रक्त उपलब्ध व्हावं यासाठी, वाशिम जिल्हा पोलिस दलाच्या वतीनं सामाजिक बांधिलकी जोपासत आज वाशिम जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या संकल्पनेतून जुन्या जिल्हा पोलीस मुख्यालयात सामूहिक रक्तदान करण्यात आले. जमा झालेले रक्त जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात येणार असून यामुळे शेकडो रुग्णांना याचा फायदा होणार आहे.यामध्ये आज  101 पोलीस बांधवांनी व भगिनींनी रक्तदान केले,असून याशिबिराची सुरुवात पोलीस कर्मचारी यांना रक्तदान करण्याकरीता प्रोत्साहन मिळावे म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांनी प्रथम  स्वतः रक्तदान करून केली,यांच्या बरोबर अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक विजयकुमार चव्हाण,वाशिम  उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.पवन बनसोड,उपविभागीय पो, अधिकारी गृह केडगे,स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवा ठाकरे यांनी सुद्धा रक्तदान केले.या शिबिरात जास्तीत जास्त 200 जण रक्तदान करणार असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांनी सांगितले, यावेळी अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.पवन बनसोड,मुख्यालय उपविभागीय अधिकारी केडगे,आर्थिक गुन्हे शाखेच्या मुर्दूला लाड मॅडम,स्थानिक जिल्हा गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवा ठाकरे,शहर पोलीस निरीक्षक बळीराम गीते,यांच्या सह जिल्हा उपशल्य चिकिस्तक डॉ.अनिल कावरखे,यांची प्रमुख उपस्थिती होती.या शिबिराला यशस्वी करणयासाठी पोलीस कर्मचारी व जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या