💥रानू मंडल यांना प्रसिद्धी मिळताच १० वर्षांनंतर परतली मुलगी....!💥कोलाकातामधील एका रेल्वे प्लॅटफॉर्मवर गाणं गातानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाल्याने रानूला ओळख मिळाली💥

राहण्यासाठी घर नव्हतं, खाण्यासाठी अन्न नव्हतं. फक्त होता सुरेल आवाज. या आवाजाने आज त्यांना जगभरात ओळख मिळवून दिली आहे. रेल्वे स्टेशनवर गाणं गाणाऱ्या रानू मंडल यांच्याबद्दल आम्ही बोलत आहोत. कोलाकातामधील एका रेल्वे प्लॅटफॉर्मवर गाणं गातानाचा त्यांचाव्हिडीओ तुफान व्हायरल झाला आणि त्यांना एक नवीन ओळख मिळाली. संगीतकार व गायक हिमेश रेशमियासाठी त्या पार्श्वगायनसुद्धा करणार आहेत. रानू यांना पैसा व प्रसिद्धी तर मिळालीच पण त्याहून मौल्यवान भेट त्यांना सोशल मीडियामुळे मिळाली. तब्बल दहा वर्षांनंतर रानू यांची मुलगी त्यांच्याकडे परतली आहे.रानू मंडल त्यांच्या मुलीपासून तब्बल दहा वर्षं दूर राहिल्या होत्या. पण व्हायरल झालेल्या व्हिडीओनंतर मुलीने त्यांचा शोध घेतला असून ती त्यांच्याकडे परतली आहे. माझी मुलगी परत आल्यामुळे खूप आनंद झाला असून माझ्या दुसऱ्या आयुष्याला सुरुवात झाल्याचे रानू यांनी सांगितले. तर दुसरीकडे पैसा व प्रसिद्धी मिळताच मुलीने आईकडे धाव घेतल्याची टीकाही सोशल मीडियावर होत आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या