💥भारतातून पाकीस्तानला जाणारे पाणी वळवण्यास सुरुवात...!💥केंद्र सरकारने हे पाणी भारतात वळवण्यास सुरुवात केली आहे💥

पुलवामामध्ये सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाल्यावर देशभरातून पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यासाठी भारतातून पाकिस्तानात जाणारे पाणी बंद करण्याची मागणी झाली. त्यानंतर भारत आपल्या वाट्याचे पाणी पूर्ण क्षमतेने वापरत नसल्याचे समोर आले. आता केंद्र सरकारने हे पाणी भारतात वळवण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी सिंधु पाणी कराराला कोणताही धक्का न पोहचवता भारताच्या वाट्याचे पाणी जे पाकिस्तानात वाहून जाते ते इतर नद्यांच्या बाजूला वळवण्यास प्रारंभ झाल्याचे सांगितले.  कोणत्या पद्धतीने पाणी वळवण्यास प्रारंभ झाला आहे, असे विचारण्यात आले असता त्यांनी सांगितले, की त्या ठिकाणी काही जलाशय आणि नद्या आहेत त्याचा उपयोग करता येईल. त्या ठिकाणी जे पाणी वाहून जाण्याचे मार्ग आहेत ते आम्ही वळवणार आहोत. सद्यस्थितीत जलाशय भरले असल्याने रावी नदीत पाणी वळविण्यात येईल..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या