💥शिक्षणप्रेमी मातेचा असाही दानशूर पुत्र आईच्या वाढदिवसा निमित्य केले शैक्षणीक साहित्याचे वाटप...!💥गणेश गावंडे यांनी त्यांच्या मातोश्री श्रीमती सिंधूुबाई आत्माराम गावंडेंच्या हस्ते केले शैक्षणिक भेट वस्तुंचे वाटप💥

फुलचंद भगत

वाशिम-जिल्हा परिषद वरीष्ठ प्राथमिक शाळा पोटी येथे भारताच्या 73 वा स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पोटी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा प्रसिद्ध व्यावसायिक आणी गावंडे आॅटोमोबाईल्सचे संचालक गणेश गावंडे यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना एक्झाम पॅड भेट म्हणून वितरण करण्यात आले. सदर भेट वस्तूंचे वाटप त्यांच्या मातोश्री श्रीमती सिंधूुबाई आत्माराम गावंडे यांचे हस्ते करण्यात आले.
       यावेळी पोटी ग्रामपंचायतच्या सरपंचा         सौ.पद्मिनाताई प्रकाशराव गावंडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिलसिंह सूर्यवंशी, केंद्रप्रमुख सुदाम भोंडने, शाळेचे मुख्याध्यापक हिरामण म्हातारमारे , उपसरपंच राहुलभाऊ इंगोले, तसेच ग्राम पंचायत पोटी चे सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, पालकवर्ग व मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांची उपस्थिती होती.
      सामाजिक उत्तरदायित्व म्हणून आपल्या गावातील  शाळेतील विद्यार्थ्यांना काहीतरी भेट देण्याचा मानस गणेशभाऊ गावंडे यांनी शाळेकडे व्यक्त केला होता. स्वातंत्र्यदिनाच्या औचित्य साधून त्यांनी आपला संकल्प पूर्ण केला व यापुढेही शाळेला आवश्यक ती मदत करण्याचे आस्वासन त्यांनी दिले. त्यांची ही स्नेहपूर्ण भेटवस्तू स्वीकारून शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनि त्यांचे आभार मानले.
सदर भेटवस्तू वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक अनिल वाढणकर यांनी केले तर कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी पदवीधर शिक्षक शरद सुरसे व ज्येष्ठ शिक्षक राजेंद्र ठोकळ यांनी प्रयत्न केले.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या