💥कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग यशस्वी,पाथर्डीच्या पूर्व,दक्षिण भागात पडला दमदार पाऊस....!


💥बुधवारी सायंकाळी चार वाजता कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी विमानांनी ढगांवर रसायनाची फवारणी केली💥

अहमदनगर - पाथर्डी तालुक्यातील पूर्व, दक्षिण भागात कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग यशस्वी झाला. बुधवारी सायंकाळी चार वाजता कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी विमानांनी ढगांवर रसायनाची फवारणी केली. त्यानंतर दमदार पावसाने हजेरी लावली आहे. दीड तास झालेल्या या पावसाने तालुक्यातील बंधारे ओसंडून वाहिले आहेत. यंदा जूननंतर समाधानकारक पाऊस पडला नाही. जूनच्या सुरुवातीला झालेल्या थोड्याफार पावसामुळे शेतकऱ्यांनी कपाशी, बाजरी, मका आदी पिकांची मोठ्या प्रमाणावर पेरणी केली. मात्र तालुक्यातील पश्चिम भागात अद्यापही दुष्काळ कायम असून अद्याप पाऊस पडलेलानाही. त्यामुळे तालुक्यामध्ये पावसाअभावी शेतकरी संकटात सापडला आहे. पावसाअभावी पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शासनाने कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी औरंगाबाद येथील विमानतळावरून तालुक्यात प्रथमच कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पाथर्डी शहरावरील जमा झालेल्या ढगांवर सुमारे एक तास विमानातून रसायनाची फवारणी करण्यात आली. परंतु वाऱ्याचा वेग जास्त प्रमाणावर असल्यामुळे रसायनांची फवारणी केलेले ढग मोहटा गावापासून पूर्व बाजूला सरकले. परंतु यामुळे मात्र करोडी, तिनखडी, मोहटा, कोरडगाव, भिलवडी, मोहजदेवढे, पिंपळगाव, टाकळीमानूर तसेच बीड  जिल्ह्यातील शिरूरपर्यंत या प्रयोगामुळे दमदार पावसाची सुरुवात झाली होती. कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी झाल्याने येत्या कालावधीत अशा स्वरूपाचा प्रयोग पाथर्डी तालुक्यातील दुष्काळ हटवण्यासाठी राबवण्याची मागणी तालुक्यातील शेतकरी वर्गातून होत आहे. याबाबत तहसील प्रशासनाकडे कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती. दरम्यान जोरदार झालेल्या पावसाने पाथर्डी तालुक्यात समाधान व्यक्त होत आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या