💥उत्तरप्रदेश मधील इलाहाबाद उच्च न्यायालयाने ध्वनी प्रदूषणासंदर्भात एक मोठा निर्णय दिला आहे...!💥आता डीजे वाजविल्यास होणार 5 वर्ष तुरुंवासाची शिक्षा💥


उत्तरप्रदेश मधील इलाहाबाद उच्च न्यायालयाने ध्वनी प्रदूषणासंदर्भात एक मोठा निर्णय दिला आहे. या निर्णयात डीजे वाजविण्यावर संपूर्ण बंदी घातली आहे. त्याचप्रमाणे या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर 5 वर्ष तुरूंगवासाची शिक्षा आणि एक लाखांचा दंड ठोठावला जाऊ शकतो. डीजे वाजवल्याची तक्रार असल्यास त्या भागातील स्टेशन प्रभारी जबाबदार असल्याचे देखील न्यायालयाने स्पष्ट केले आहे. डीजेवर बंदी घालावी यासाठी हासिमपुरमधील रहिवाशी सुशील चंद्र श्रीवास्तव सोबतच अन्य लोकांनी देखील न्यायालयात याचिका दाखल केली होती. सुशील चंद्र श्रीवास्तव यांच्या याचिकेत हासिमपुरामध्ये सायंकाळी 4 वाजल्यापासून ते रात्री उशिरापर्यत डीजे वाजविला जाते. तसेच माझ्या घरी 84 वर्षीय आई असल्यानेतिला मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याचे सांगितले होते.  या याचिकेवर न्यायमूर्ती पीकेएस बघेल आणि पंकज भाटिया यांनी याबाबत निर्णय दिला आहे. न्यायालयाने सांगितले की, लहान मुलांसोबतच जेष्ठ नागरिक आणि रुग्णालयातील लोकांना ध्वनी प्रदुषण अतिशय धोकादायक आहे. त्याचप्रमाणे ध्वनीप्रदूषण नियंत्रण कायद्याचे आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारे आहे. त्याचप्रमाणे सर्व धार्मिक सणाच्या पहिले डीएम व एसएसपी यांनी बैठक बोलावून कायदा बनविण्याचे आदेश दिले आहे. तसेच या कायद्याचे उल्लंघन केल्यास 5 वर्ष तुरुंगवास आणि 1 लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या