💥पोषण आहाराची तपासणी करन्यासाठी शाळांवर अधीकार्‍यांनी आकस्मिक भेटी देन्याची गरज...!



💥मोठ्या प्रामाणात गैर प्रकार ऊघड होन्याची शक्यता गरीब मुलांच्या मुखातील घास विकणारांची गय करु नये💥

फुलचंद भगत
मंगरुळपीर: तालुक्यातील मोहरी येथील जिल्हा परिषद शाळेतील पोषण आहाराचे धान्य मुख्याध्यापक आणि शाळा समिती उपाध्यक्षांनी संगनमत करून विकले, अशी तक्रार मोहरी येथील पालकवर्ग व गावकºयांनी केली आहे.या तक्रारीची दखल घेवून चौकशी होवून चौकशी अहवालही वरिष्ठांना पाठवला आहे.शालेय पोषण आहाराच्या अफरातफरीचे अजुनही बरेच प्रकरणे ऊघड होन्याची दाट शक्यता नाकारता येत नाही याकरीता वरिष्ठांनी आकस्मीक भेटी देवुन तपासणी करणे गरजेचे असल्याचे पालकांमधुन मागणी होत आहे.
          मोहरी येथील पोषण आहाराचे धान्य विकल्याने या संदर्भात गावकºयांनी गटशिक्षणाधिकारी मंगरुळपीर, जि.प. शिक्षणाधिकारी यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे २१ आॅगस्ट रोजी निवेदन सादर करून संबंधितांवर कारवाईची मागणी केली होती.
मोहरी येथे जिल्हा परिषदेची पहिली ते चौथ्या वर्गापर्यंतची शाळा असून, या शाळेत ६२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेत मुख्याध्यापकासह दोन शिक्षक कार्यरत आहेत. इतर शाळांप्रमाणेच या शाळेतही विद्यार्थ्यांना पोषण आहारांतर्गत खिचडीचे वाटप करण्यात येते. तथापि, या पोषण आहारासाठी मिळालेला तांदुळ मुख्याध्यापक आणि शाळा समिती उपाध्यक्षांनी विकला, अशी तक्रार गावकºयांनी गटशिक्षणाधिकारी मंगरुळपीर, जि.प. शिक्षणाधिकारी यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती.तक्रारीची गांभीर्याने दखल घेवुन पंचायत समीतीच्या शिक्षण विभागाने प्रत्यक्ष जावुन चौकशीही केली आली त्यासंदर्भातला अहवाल मुख्य कार्यकारी अधीकारी यांचेकडे पाठविल्याचे सबंधीत अधिकार्‍यांनी सांगीतले.असे मंगरुळपीर तालुक्यामध्ये शालेय पोषण आहाराचे अनेक अपरातफरीचे प्रकरणे ऊजेडात येवु शकतात त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडुन विषेश मोहीम राबवुन शाळांवर आकस्मीक भेटी देणे गरजेचे असल्याचे पालकांचे मागणे आहे.मोहरी येथील प्रकरण काही अधीकार्‍यांनी मध्यस्थी करुन मिटविन्याचा प्रयत्न केल्याचीही जोरदार चर्चा होती परंतु जिथे खुद्द ग्रामपंचायतची आणी पालकांची तक्रार आहे तसेच यासंदर्भात ग्रा.पं.मध्ये ठरावही घेतला आहे व वृत्तपञामधेही बातम्या प्रकाशीत झाल्याने आपल्यावर प्रकरण शेकु नये म्हणून काहींनी हात काढुन घेतल्याचेही समजले.गलेगठ्ठ पगार असणार्‍या ज्ञानदात्यांनी जर अशाप्रकारे गोरगरीब मुलांच्या मुखातला घास विकन्याचा प्रकार केला असेल तिथेल कर्तव्यदक्ष असणार्‍या मुख्य कार्यकारी अधीकार्‍याकडे कदापीही माफी नसणार अशी अपेक्षाही पालकांनी बोलुन दाखवली आहे.यावर जि.प.प्रशासन काय भुमीका घेते यावर सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या