💥गंगाखेडच्या मन्नाथ मंदिरात भक्तांसाठी मोफत फराळ....!🔹सावता माळी मित्र मंडळाचा ऊपक्रम 🔹

गंगाखेड :
श्रावण मासानीमीत्ताने शहरापासून जवळच असलेल्या मन्नाथ मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत आहे. या भाविकांना मोफत साबुदाणा खिचडी आणि चहाचे वाटप करण्याचा ऊपक्रम सावता माळी मित्र मंडळ गेल्या अनेक वर्षांपासून राबवत आहे. यंदाही हा ऊपक्रम आज पहाटे पासून राबविण्यात आला. साई सेवा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष गोविंद यादव, धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष सखाराम बोबडे यांनी आज या ऊपक्रमास भेट देवून या युवकांचे कौतूक केले.

गंगाखेड शहराच्या दक्षीणेस प्रसिद्ध मन्नाथ मंदिर आहे. श्रावण महिण्यात शहर व परिसरातील अनेक भाविक मध्यरात्री पासूनच दर्शनासाठी गर्दी करत असतात. या भाविकांची सोय व्हावी, या हेतूने अनेक भक्त मंडळी रस्त्यावर आणि मंदीर परिसरात विविध सेवा देत असतात. यातच खडकपूरा गल्लीतील श्री संत सावता माळी मित्र मंडळाने पहाटे पासून खिचडी वाटपाचा ऊपक्रम सुरू केला. याचा अनेक भाविकांनी लाभ घेतला. कचरूबा आढाव, रमेश शिंगणे, गोविंद औटी, पप्पू गिराम, सखाराम वाघे, परसराम गिराम, मधुकर शिंदे, लक्ष्मण गिराम, सुधाकर शिंदे, मुन्ना भोसले, बंडू नरवाडे, नितीन तरटे, सावता गिराम, ज्ञानेश्वर नगरकर, राजेश यादव, दुर्गादास गिराम, राम गिराम, राजेश रोकडे आदिंसह मित्र मंडळाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी ऊपक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. यापुढे ही समाजपयोगी ऊपक्रम राबविण्यचा मनोदय या युवकांनी याप्रसंगी व्यक्त केला. तर यादव, बोबडे यांनी अशा कार्यास शक्य ती सर्व मदत करण्याची हमी या प्रसंगी बोलताना दिली...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या