💥बोगस खतांचा पुरवठा केल्याप्रकरणी लोकमंगल बायोटेकवर गुन्हा दाखल...!


💥लोकमंगल बायोटेक ही कंपनी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याशी संबंधित आहे💥

बोगस खतांचा पुरवठा करुन शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या लोकमंगल बायोटेकवर गुन्हा दाखल झाला आहे. लोकमंगल बायोटेक ही कंपनी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याशी संबंधित आहे. कृषी विभागाने ही कारवाई केली आहे.मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मिश्रखतांचा पुरवठा केल्याप्रकरणी लोकमंगल बायोटेकचे मालक, संचालक, रसायनशास्त्रज्ञ आणि व्यवस्थापकांविरोधात फसवणुक प्रकरणी भादंवि कलम ४२० आणि कलम ३४ नुसार तसेच अत्यावश्यक वस्तू कायद्याच्या ३ आणि ७ कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे.मराठवाड्यात विकली जाणारी अनेक मिश्रखते ही बनावट असल्याचे कृषी विभागाच्या तपासणीत उघड झाले होते. यानंतर लाखो रुपयांच्या या बोगस खतांचा साठा जप्त करण्यात आला होता. खतं आणि त्याच्या विक्रीबाबत अनियमितता आढळल्यास गुन्हा दाखल करण्याचा आदेश कृषी आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार, लोकमंगल बायोटेक प्रा. लिमिटेड कंपनीतील सहा नमुने अप्रमाणित निघाल्याने औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले. दरम्यान, लोकमंगल बायोटेकच्या संचालक मंडळावर आपण नसल्याने आपला याप्रकरणाशी संबंध नसल्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी म्हटले आहे. मात्र, त्यांचे नातेवाईक या मंडळावर आहेत. यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोलापूरातील लोकमंगलच्या सर्वच उत्पादनांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.,.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या