💥औरंगाबाद उच्च न्यायालयाने दिली गुटखा तस्करी प्रकरणातील ३ प्रमुख आरोपींना चपराक...!


💥पुर्णा पोलीस प्रशासनाच्या यशस्वी तपासाचा परिणाम, गुटखा तस्करांचे धाबे दणानले💥

पुर्णा/पुर्णा पोलीस स्थानकातील कर्तव्यदक्ष पो.नि.सुभाषराव राठौड यांच्या मार्गदर्शना खाली कर्तव्यकठोर दबंग पो.उप.नि.चंद्रकांत पवार यांनी  केलेल्या गुटखा धाड प्रकरणात अत्यंत काटेकोरपणे  केलेल्या यशस्वी तपासामुळे गुटखा धाड प्रकरणातील फरार असलेल्या आरोपींना पळता भुई कमी पडत असून या प्रकरणातील प्रमुख ३ आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज औरंगाबाद उच्च न्यायालयाने फेटाळला आहे.

गुटखा धाड प्रकरणात पो.उप.नि.पवार यांनी कुणालाही न जुमानता प्रथमच अत्यंत काटेकोरपणे तपास केल्याने भेदरलेल्या गुटखा तस्करांनी गुटखा धाड प्रकरातील तपासात संबंधित अधिकाऱ्यांवर गुटखा तस्करांनी आपल्या राजकीय हस्तकांमार्फत राजकीय दबावतंत्राचा वापर तर करण्याचा प्रयत्न केलाच याशिवाय संबंधित अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करीत मानसिक खच्चीकरण करुन वरीष्ट अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न हीं केला परंतु यत्किंचितही न डगमगता या प्रकरणाचा तपास करणारे पो.उप.नि.पवार यांनी अत्यंत खंबीरपणे गुटखा धाड प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला हीं अत्यंत कौतुकास्पद बाब म्हणावी लागेल त्यांच्या या धाडसी व कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
         पुर्णा पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, पुर्णा पोलिस ठाण्याचे पो.नि.सुभाष राठौड व फौजदार चंद्रकांत पवार व त्यांच्या पथकाने पुर्णा व पालम, जिंतूर येथे छापेमारी करीत तब्बल २२ लाखांचा गुटखा पकडून गुटखा माफीयांमध्ये एकच खळबळ उडवून दिली होती.याप्रकरणी पुर्णा पोलीस ठाण्यात दि. १२ जुन रोजी गुरनं १८१/१९ नुसार कलम ३२८,२७२, २७३,१८८,१२० (ब) भादवी अन्नभेसळ २००६ कायद्यान्वये १० जणां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.याप्रकरणात ७ आरोपींना पुर्णा पोलिसांनी गजाआड केले होते.तर त्यापैकी फरार असलेल्या शे. नूर शेख सरवर,संदीप लकडे, रफीक कुरेशी यांनी औरंगाबाद हाय कोर्टात अटकपूर्व जlमीन मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला होता.
बुधवारी १४ रोजी औरंगाबाद येथील हायकोर्टाने आपला निर्णय जाहीर करीत अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला असल्याचे घोषित केले.या गुटखा प्रकरणातील आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून लावल्याने आता सदरील आरोपीस पुर्णा पोलीस कधी गजाआड करणार याकडे लक्ष लागले आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या