💥बहुप्रतीक्षित पोलीस भरती जाहीर,राज्यात महापोर्टलद्वारे प्रथमच होणार भरती...!


💥भरती प्रक्रियेसाठी ३ सप्टेंबरपासून ऑनलाईन अर्ज स्वीकारणार आहेत. तर २३ सप्टेंबर अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख💥

अखेर बहुप्रतीक्षित पोलीस भरती एकदाची जाहीर झाली आहे. भरती प्रक्रियेसाठी ३ सप्टेंबरपासून ऑनलाईन अर्ज स्वीकारणार आहेत. तर २३ सप्टेंबर अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ठेवली आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यातील सर्व आयुक्तालय पोलीस परीक्षेत्रामध्ये ही भरतीbप्रक्रिया सुरू होणार आहे. गृहविभागाने मोठे  अभूतपूर्व बदल केल्यानंतर, तसेच महापोर्टलद्वारे राज्यात होणारी ही पहिली भरती प्रक्रिया आहे.गृहविभागाने पोलीस भरतीपरीक्षेत  मोठे बदल केले आहेत. यापूर्वी मैदानी चाचणी अगोदर घेतली जात असे. उत्तीर्णहोणाऱ्या उमेदवारालाच लेखी परीक्षेला पात्र ठरवले जात असे. मात्र, नवीन निर्णयानुसार पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. ही लेखी परीक्षा पूर्वीप्रमाणेच  ९० मिनिटांची १०० गुणांची घेतली जाणार आहे. यामध्ये परीक्षेची वेळ, परीक्षेचे घटक ‘जैसे थे’ ठेवण्यात आले आहेत. सामान्यज्ञान, चालू घडामोडी, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण या चार घटकांचा समावेश आहे. लेखी परीक्षेत खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना किमान ३५ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. मागास प्रवर्गातील उमेदवारांना ३३ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. लेखी परीक्षेतून एका जागेसाठी १० याप्रमाणे मैदानी चाचणीची संधी दिली जाणार आहे. मैदानी चाचणी परीक्षेतदेखील अभूतपूर्व बदल केले आहेत. त्यानुसार मुलांची १०० गुणांची मैदानी चाचणी ५०गुणांवर आणली आहे. तसेच मुलांच्या चाचणीतून लांबउडी, पूलअप्स काढले आहेत. मुलांसाठी ठेवलेल्या ५० गुणांच्या मैदानी परीक्षेत ३० गुणांसाठी १६०० मीटर धावणे, १० गुणांसाठी १०० मीटर धावणे, गोळा फेकसाठी १० गुणांचा समावेश आहे, तर  मुलींसाठी ठेवलेल्या मैदानी परीक्षेत मुलींना ८०० मीटर धावणेसाठी ३० गुण, १०० मीटर धावणे १० गुण, गोळाफेक १० गुण ठेवण्यात आले आहेत. अशा प्रकारे लेखी परीक्षेतील १०० गुण आणि मैदानी चाचणीतील ५० गुण अशा एकूण १५० गुणांतून उमेदवाराची निवड केली जाणार आहे.विशेष बाब म्हणजे  राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ ) व भारत राखीव बटालियन (आयआरबी) या पदांसाठी मात्र १०० गुणांची मैदानी चाचणी घेतली जाणार आहे. यामध्ये ५  किलोमीटर धावणे, १०० मीटर धावणे या प्रकारांचा समावेशआहे. १०० गुण लेखी परीक्षेसाठी व १०० गुण मैदानी चाचणीसाठी अशा २०० गुणांतून एसआरपीएफ आणि आयआरबीच्या पदांसाठी निवड करण्यात येणार आहे.

उत्तीर्ण उमेदवारच मैदानी परीक्षेसाठी पात्रराज्यात २०१९ मध्ये होणाऱ्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेमध्ये गृह विभागाने मोठे अभूतपूर्व बदल केले आहेत. त्यानुसार ही परीक्षा होणार आहे. यामध्ये आता भरतीसाठी इच्छुक उमेदवारांची प्रथम लेखी परीक्षाघेण्यात येणार आहे. यामध्ये उत्तीर्ण झालेला उमेदवारच मैदानी परीक्षेसाठी पात्र ठरणार आहे. नव्या निर्णयानुसार पोलीस शिपाई सेवा प्रवेश २०१२ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या