💥हिरकणी सीबीएसई स्कुलमध्ये स्वातंत्र्यता दिवस उत्साहात साजरा...! 💥श्री गोपाळराव देवकते यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहन💥 

राणीसावरगाव,ता.15,(बातमीदार) : येथून जवळच असलेल्या हिरकणी सीबीएसई स्कुल चोरवड येथे भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्री गोपाळराव देवकते यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी प्राचार्य अशोकराव लवटे,राजकुमार लांडगे, संतोष डोणे,संजय रायबोले स्वप्निल निळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी  विद्यार्थ्यांनी देशभक्ती पर गीते व लघु नाटीकाचे सादरीकरण केले.
कार्यक्रमासाठी प्रा.राम सोळंके,नितेश तांबे,धीरज जावीर,नारायण गांजले, नितीन गंभीर, शेख अहमद, शेख रहीम,शेख अब्दुल, रंजित सिंग, वर्षा दुबे, जयश्री लवटे, अल्का कदम, अमोल लवटे, ज्ञानेश्वर लवटे आदींनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. विद्यार्थ्यांसह पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या