💥सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदेंचा राजकारणात प्रवेश....!💥महाराष्ट्र स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी स्वीकारली💥


सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी स्वीकारली आहे. सोलापुरात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ व सोलापूर शहर मध्य हे मतदारसंघ राखीव आहेत. त्यामुळे आनंद शिंदे आगामी विधानसभा निवडणूक लढवणार का अशा चर्चांना उधाण आले आहे.आनंद शिंदेंचा मंगळवारी इंदापूरजवळ अपघात झाला होता. ते आता सुखरुप आहेत.आनंद शिंदे आणि त्यांचा मुलगा डॉ. उत्कर्ष शिंदे यांनी शिवसेनेतून विधानसभा निवडणूक लढवावी यासाठी शिवसेनेने जोरदार प्रयत्न केले होते. उद्धव ठाकरे यांनी शिंदे पिता-पुत्राला विधानसभेची ऑफर दिली असून आठवड्याभरापूर्वी मातोश्रीवर याबाबत बैठक झाल्याची माहिती होती. मात्र या बैठकीत आनंद शिंदे यांनी आपल्याला निवडणूक लढवण्यात रस नसल्याचे स्पष्ट केले होते. शिवसेनेबरोबरच राष्ट्रवादी, आरपीआय आणि एमआयएम पक्ष ही शिंदे पिता-पुत्राला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या