💥केंद्रीय कन्या शाळेच्या चिमुकल्यांनी संकलित केला निधी...!💥शहरातून चिमुकल्यांनी 16 हजार 100 रुपये एकूण (सोळा हजार शंभर रुपये) संकलित केले💥

सोनपेठ (प्रतिनीधी) सोनपेठ शहरात विविध उपक्रमात जिल्हा परिषदेची केंद्रीय कन्या शाळा नेहमीच अग्रेसर असते या शाळेच्या चिमुकल्यांनी कोल्हापूर-सांगली पूरग्रस्तांसाठी शहरातील लहान-थोर व्यापारी महिला-पुरुष लहान मुली यांच्या कडून "मदत करा मदत करा पूरग्रस्तांना मदत करा" घोषणा देत कुणाची 1,2,5. रुपये कुणाची 10,20,50,100,200 व 500 रुपये असे शहरातून 16 हजार 100 रुपये एकूण (सोळा हजार शंभर रुपये) संकलित करण्यात आली यामध्ये विशेष दिनांक 13 ऑगस्ट 2019 मंगळवार रोजी संदीप लष्करे सरांचा वाढदिवस त्यांनीही 500/- पाचशे रुपये या निधीत भर घालून पूरग्रस्तांना मदत करूनच साजरा केला तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक रमेश राठोड यांनीही 500 /- पाचशे रुपये या संकलित निधीत पूरग्रस्तांना मदत दिली याप्रसंगी या अॕटोद्वारे आव्हान करताना अंजली कदम, वैष्णवी मुळे तर निधी संकलन करण्यासाठी पहिला बॉक्स सहावीच्या मुली किरण रोडे, सांची हिरवे, सिद्धी मस्के व श्रावणी अन्नपुर्णे तर दुसरा सातवी मुल वितोष मोरे, ओम जवादे व गणेश कळसकर यांनी तर तिसरा बॉक्स आठवीची मुलं शंतनु बंसोडे, सोहम महाजन व चैतन्य अंभोरे आदींसह ढोल पथक व बॅनर सागर गावडे, मनोज दहिवाळ, बनसोडे, रोहित स्वामी आदींनी परिश्रम घेतले यावेळी प्रमुख उपस्थिती शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा संपादक किरण स्वामी सदस्य असे मुलांनी सर्व सदस्य व सदस्य तसेच मुख्याध्यापक प्रदीप गायकवाड, वाल्मीक लहाने, रामेश्वर राऊत, कल्याण राठोड, केशव पांचाळ, अमोल गोरे, सुनीता जोशी, नयना बारगजे, सुवर्णा गायकवाड, रंजना डोंगरे , सविता भराडे आणि प्रकाश तिरमले आदींचे विशेष सहकार्य लाभले सर्व संकलित 16100/- रुपये (सोळा हजार शंभर रुपये) मुख्यमंत्री सहाय्यता निधीस केंद्रीय कन्या शाळा सोनपेठ च्या नावे डि.डी. काढून जमा करण्यात आला आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या