💥हिंगोलीत दोन गटाच्या वादातून तुफान दगडफेक,शहरात तणावसदृश्य स्थिती....!



💥जिल्हा पो.अ.श्री.योगेश कुमार यांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे व शांतता राखण्याचे नागरिकांना केले आवाहन💥

हिंगोली शहरातील औंढा मार्गावर दोन गटांत वाद निर्माण झाल्यानंतर हजारोंच्या जमावाने शहरातील दुकाने, वाहनांवर दगडफेक केल्याने मोठे नुकसान झाले असून नागरिकांमध्ये दहशतिचे वातावरण आहे. शहरात संचारबंदी सदृश्य वातावरण असून परिस्थिती नियंत्रणातआहे.सकाळी साडेनऊ ते दहा वाजेच्या दरम्यान दोन समाजाचे नियोजित कार्यक्रम त्यांच्या-त्यांच्या नियोजनप्रमाणे चालत होती. यासाठी जाणाऱ्या वाहनांवर अचानक दगडफेक झाली. कोणीतरी आक्षेपार्ह घोषणा दिल्याचा आरोप होता. त्यानंतर जमावाने या भागातील शेकडो दुकाने व वाहनांवर दगडफेक केली. गांधी चौक ते जिल्हा कचेरीच्या कोपऱ्यापर्यंत, एनटीसी भागात अशी तोडफोड झाली. यात लाखोंचे नुकसान झाले. यात अनेकजण जखमीही झाले असून काहींना गंभीर दुखापत झालेली आहे.पोलिसांना या दोन्ही कार्यक्रमांबाबत माहिती असतानात्यांनी पुरेसे नियोजन केले नसल्याचे दिसून आले. त्यामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप होत आहे. घटनेनंतर मात्र पोलिसांनी जागोजाग नाकेबंदी केली. या घटनेमुळे मात्र शहरात संचारबंदी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्य रस्ते निर्जन दिसत असून ग्रामीण भागातून आलेली मंडळी गावाकडे परतत होती. तर शहरातील अनेक भागात दुकानेही बंद ठेवली होती. दरम्यान, पोलीस अधीक्षक योगेशकुमार, अति.पोलीस अधीक्षक यशवंत काळे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, अतुल चोरमारे, सुधाकर रेड्डी आदींनी घटनास्थळी भेट दिली.या घटनेनंतर कावड यात्रेलाही परवानगी नाकारली होती. मात्र संयोजक तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी शांततेत ही यात्रा काढण्याचे आश्वासन दिल्याने कावड यात्रेला परवानगी दिली. साडेअकराच्या सुमारास जत्थे पुन्हा कळमनुरीकडे रवाना झाले.
दरम्यान नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नए व शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरीता पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक श्री.योगेशकुमार यांनी केले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या