💥 महिलांनी कायद्याचे ज्ञान घेऊन निर्भयपणे जगले पाहिजे - पो.उप.निरिक्षक चंद्रकांत पवार💥पवार महाविद्यालयात रॅगिंग विरोधी कायदे 'या विषयावरील कार्यक्रमात श्री पवार प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते💥

पूर्णा(जं.) महिलांनी कायद्याचे ज्ञान घेऊन निर्भयपणे जगले पाहिजे असे प्रतिपादन सहाय्यक पोलीस निरीक्षक सी.पी. पवार यांनी केले.येथील स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात "महिला तक्रार निवारण समिती" अंतर्गत घेण्यात आलेल्या 'रॅगिंग विरोधी कायदे 'या विषयावरील कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

आजच्या सोशल मिडीया अंतर्गत जे सायबर गुन्हे घडत  आहेत त्यामुळे अनेक युवकांच्या जीवनाचे नुकसान होत असून समाजाची शांतता भंग होतांना दिसत आहे. म्हणून महिला व पुरुषांनी समाजातील चांगल्या गोष्टीचे अनुकरण करून व कायद्याचे ज्ञान घेऊन  सौहार्दपूर्ण वातावरण कसे राहिल याची काळजी घ्यावी असेही त्यांनी यावेळी आपल्या  मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना आवाहन केले.याप्रसंगी समाजातील अनेक घडलेल्या गुन्ह्यांचे उदाहरणे देऊन कायद्याची माहितीही त्यांनी विद्यार्थ्यांनाा समजावून सांगितली. यावेळी  महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सद्भावना दिनानिमीत्त सर्व विद्यार्थ्यांना एकतेची शपथ देण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष  महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.विनायक क्षीरसागर हे होते.समाजातील घडणा-या गुन्हेगारी घटनेस कायद्याचे ज्ञान नसल्यामुळे अनेकदा स्त्री-पुरूष दोघेही तेवढेच जबाबदार असतात.म्हणून आजच्या काळात स्त्री-पुरूष दोघांनाही कायद्याचे ज्ञान करून घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात सांगितले.यावेळी शहरातील प्रतिष्ठीत नागरीक तथा समितीच्या सदस्यां सौ.स्मिता कदम या उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीच्या समन्वयक डाॅ.शारदा बंडे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपाली काळे यांनी केले तर आभार मेघा ठाकुर  यांनी मानले.या कार्यक्रमासाठी प्राचार्य डाॅ.विनायक क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली समितीचे समन्वयक डाॅ.शारदा बंडे,डाॅ.भारत चापके,प्रा.दीपमाला पाटोदे यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमासाठी   प्राध्यापक,कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या