💥वाशिम बडनेरा रेल्वेमार्ग मागणीसाठी ग्रामसभेत ठराव घेन्याचे आवाहन...! 💥नरखेड बडनेरा वाशिम रेल्वे मार्ग विस्तार कृती समितीच्या वतीने करण्यात आले आव्हान💥

फुलचंद भगत

वाशीम- जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरिता येत्या स्वातंत्र्यदिनी होऊ घातलेल्या ग्रामसभामध्ये सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावकरीनी बडनेरा-वाशिम रेल्वे मार्ग निर्मितीच्या मागणीचा सर्वानुमते ठराव पारित करावा. ठरावाची एक प्रत कृती समितीकडे जमा करावी. असे आव्हान नरखेड बडनेरा वाशिम रेल्वे मार्ग विस्तार कृती समितीच्या वतीने करण्यात आलेली आहे.

 वाशिम जिल्ह्याची निर्मिती होऊन 21 वर्षे लोटले तरी पाहिजे तेवढ्या प्रमाणात जिल्ह्याचा विकास होऊ शकलेला नाही. वाशीम जिल्ह्यात आज रोजी भयावह बेरोजगारी, शेतमाला करिता पुरेशा बाजाराचा अभाव, दळणवळणाची अपुरी साधने इत्यादी कारणाने वाशिम जिल्हा मागासलेला राहिला आहे. याकरिता प्रस्तावित बडनेरा-वाशिम रेल्वे मार्ग तात्काळ कार्यारंभ होणे गरजेचे आहे. करिता खालील प्रमाणे वाशिम जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीने येत्या ग्रामसभेमध्ये सर्वानुमते खालील ठराव मंजुरात करावा. त्या ठरावाची एक प्रत रेल्वे कृती समितीकडे पोहोचवावी. असे आव्हान प्रसिद्धी पत्रकाद्वारे रेल्वे कृती समितीने केले आहे.
विकासाच्या गतीमध्ये आमचा वाशिम जिल्हा माघारलेला आहे. म्हणून आपण आकांक्षीत जिल्हा योजनांमध्ये आमच्या वाशिम जिल्ह्याची निवड केलेली आहे. शेतमालाचे चांगले उत्पादन असून सुद्धा बाजारा अभावी आम्हाला योग्य भाव मिळू शकत नाही.  वाशिम जिल्ह्यामध्ये रोजगाराची व उद्योग-व्यवसायाची कुठलीही संसाधने नाहीत. याचे मुख्य कारण म्हणजे दळणवळण करता आमच्या जवळ माफक व्यवस्था नाही. नरखेड-बडनेरा-वाशीम हा रेल्वे मार्ग पैकी उर्वरित बडनेरा-वाशिम रेल्वेमार्ग 108 कि.मी. त्वरित निर्माण झाल्यास, उत्तर-दक्षिण व पूर्व-पश्चिम भारताच्या रेल्वेमार्गाचे अंतर कमी होईल.बाजारपेठेच्या पर्यायांची व्याप्ती वाढून शेतकऱ्यांना अधिक फायदा होईल. तसेच आमच्या वाशिम जिल्ह्यातील सर्वांगीण विकासाची दारे उघडतील.म्हणून आम्ही स्वातंत्र्यदिनी ग्रामसभेच्या द्वारे सर्व गावकरी ठराव पारित करतो की, आम्हाला त्वरित बडनेरा-वाशिम हा रेल्वेमार्ग निर्माण करून द्यावा. अशा आशयाचा ठराव मांडावा असे आवाहन रेल्वे कृती समितीने आवाहन केले आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या