💥अज्ञात हल्लेखोराने कोकुलवार यांच्यावर त्यांच्या चौफाळा येथील संपर्क कार्यालया बाहेर झाडली गोळी💥
नांदेड/नांदेड महानगर पालिकेचे काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि गोल्डमॅन गोविंद कोकुलवार यांच्यावर त्यांच्या चौफाळा भागातील संपर्क कार्यालया बाहेर आज शनिवार दि.१७ अॉगस्ट रोजी सायं.०६-०० वाजेच्या सुमारास गोळीबार करण्यात आला.गोविंद कोकुलवार त्यांच्या पाठीवर अज्ञात हल्लेखोराने गोळी झाडली. या हल्यात कोकुलवार गंभीर जखमी झाले आहेत.त्यांना तातडीने नांदेड मधील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कोकुलवार यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना मुंबईला हलवण्याची तयारी सुरु आहे.
मिळालेली माहिती अशी की, गोवींद कोकुलवार हे आज शनिवारी सायंकाळी चौफाळा भागात त्यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर आले असता दूचाकीवर आलेल्या अज्ञात हल्लेखोराने त्यांच्या पाठीवर जवळून गोळी झाडली.नंतर हल्लेखोर पसार झाला. दरम्यान, या घटनेनंतर चौफाळा भागात तणाव पसरली आहे.
💥खंडणी देण्यास नकार दिल्याच्या कारणामुळे त्यांच्यावर गोळीबार केल्याचा अंदाज व्यक्त होत आहे💥
काही दिवसांपूर्वी गोविंद कोकुलवार यांना खंडणीसाठी धमकी आल्याची देखील माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे. दरम्यान, यापूर्वी शहरात दोन व्यापाऱ्यांवर देखील गोळीबार झाल्याच्या घटना घडल्याने व्यापारी वर्गात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
0 टिप्पण्या