💥वनोजा येथील सर्पमिञानी ३ सापांना दिले जीवनदान...! 💥जिवणदान दिलेल्या सापांमध्ये १ विषारी तर २ बिनविषारी सापांचा समावेश💥 

फुलचंद भगत

मंगरुळपीर-वाईल्ड लाईफ कंझर्वेशन टिम मंगरुळपीर शाखा वनोजा येथील सर्पमिञांनी  वनोजा येथील ३ सापांना जीवनदान दिले.यामध्ये १ विषारी तर २ बिनविषारी सापांचा समावेश. सर्वात आधी माळशेलु येथील चेतन डोंगरे यांनी दिलेल्या माहितीनुसार रमेश भगत यांच्या शेतातील विहिरीत पडलेल्या नाग या विषारी जातीच्या सापाला सर्पमित्र अमर खडसे, शुभम हेकड व आदित्य इंगोले यांनी मोठ्या शिताफीने व सुरक्षितरीत्या ३ तासाच्या अथक परिश्रमाने क्कच स्टिक व झाडाच्या फांद्यांच्या सहायाने पकडुन सुरक्षित जंगलात सोडत जीवनदान दिले. त्यानंतर वनोजा येथे आढळलेल्या पाणदिवड या बिनविषारी सापाला टिम च्या वैभव गावंडे व आदित्य इंगोले यांनी पकडुन जंगलात सोडत जीवनदान दिले. तसेच वनोजा येथील अहिल्यादेवी होळकर चौकात आढळलेल्या कवड्या या बिनविषारी सापाला सर्पमित्र आदित्य इंगोले व शुभम हेकड यांनी पकडुन जंगलात सोडत जीवनदान दिले. सदर सर्व घटनेची माहिती वनविभागाला दिली.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या