💥5 सप्टेंबर रोजी जिओ फायबर लाँच होणार, ७०० रुपयांपासून प्लॅन सुरु...!



💥जिओच्या तिसऱ्या वाढदिवशी जिओ फायबर कमर्शिअल लाँच करण्यात येणार💥 

मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) कंपनीची मुंबईत सोमवारी ४२वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली.  यात बहुप्रतिक्षित जिओ गिगाफायबर सेवा, जिओ फोन ३,जिओ सेटऑफ बॉक्स आणि जिओ गिगा टीव्ही या सेवांबाबत इतर सेवांची घोषणा केली. पाच सप्टेंबर जिओच्या तिसऱ्या वाढदिवशी जिओ फायबर कमर्शिअल लाँच करण्यात येणार आहे. याचे ७०० रुपयांपासून प्लॅन सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.कार्यक्रमाच्या सुरूवातीला मुकेश अंबानी यांनी आपल्या शेअर होल्डरला (समभागधारक)संबोधित केले. यावेळी त्यांनी रिलायंस कंपनीच्या वाटचाल आणि यशाबद्दल सर्वांचे आभार मानले. तसेच सौदी अरॅमकोशी तेलाच्या क्षेत्रात रिलायन्सची भागीदारी झाल्याची माहिती यावेळी दिली. सौदी अरॅमको कंपनी रिलायन्समध्ये २० टक्के गुंतवणूक करणार असल्याचे अंबानी यांनी सांगितले.  साऊदी अरामको रिलायंस इंडस्ट्रीजमध्ये ७५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे.रिलायंस भारतामध्ये सर्वाधिक जीएसटी आणि आयकर भरणारा उद्योग समुह ठरल्याचे मुकेश अंबानी यांनी सर्वसाधारण सभेमध्ये म्हटलेय.  जिओनं गेल्या वर्षभरात मोठी भरारी घेतली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी जिओचं योगदान मोठं आहे. जिओने भारतामध्ये ३२ टक्के व्यवसायावर आपलं वर्चस्व स्थापन केल्याचे मुकेश अंबानी यांनी सांगितले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या