💥गुरुपौर्णिमा उत्सवा निमित्त १५ जुलै  ते १७ जुलै पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन💥


प्रतिनिधी

पाथरी:-श्री साईबाबा जन्मस्थान मंदिर श्री साई स्मारक समिती पाथरी येथे गुरुपौर्णिमा उत्सवा निमित्त १५ जुलै  ते १७ जुलै पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये पहिल्या दिवशी दिनांक १५ जुलै रोजी दुपारी साडे तीन  ते साडे पाच या वेळेत माधवराव महाराज आजेगावकर यांचे सुश्राव्य किर्तन झाले. सायंकाळी सात वाजता ओंकार संसारे यांचा भक्ती संगीताचा कार्यक्रम . मुख्य दिवस दिनांक १६ जुलै मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता श्री आजेगावकर महाराज यांचे कीर्तन झाले. दुपारी साडे बारा वाजता काही सत्कार मूर्तींचे अध्यक्षांच्या हस्ते सत्कार करण्यात आले यामध्ये परळीचे उत्तमराव देशमुख यांचा साईबाबा जन्मस्थान मंदिर ला नंदी व बाबांचा बसण्याचा दगड अर्पण केल्या बद्दल सत्कार करण्यात आला, औरंगाबादचे शरद राव देऊळगावकर यांनी लिहिलेल्या "साई बाबा शोध आणि बोध" पुस्तकाचा प्रकाशन सोहळा झाला, परभणी ते दीपक जयस्वाल व त्यांचे सहकुटुंब यांचा साईबाबांच्या मंदिराची सेवा म्हणून फुलांची सजावट केल्या बद्दल सत्कार झाला, प्रकाश शेठ सामंत व मुंदडा शेठ यांचा मानवत रोड ते परळी रेल्वे मार्गा विषयी पाठपुरावा केल्याबद्दल सत्कार झाला, पत्रकार  किरण घुंबरे पाटील  यांचे सहकुटुंब व सहकारी पत्रकार तसेच मानवत चे के.डी. वर्माजी यांचा वृत्तपत्रात प्रसिद्धी बाबत सत्कार करण्यात आला, जन्मस्थान मंदिरचे मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण कुलकर्णी व सेवेकरी प्रताप आम्ले यांचा उत्कृष्ट कामकाजा बद्दल सत्कार करण्यात आला, तसेच ओंकार संसारे यांचा "श्री साई चालीसा" ऑडिओ क्लिप केल्या बद्दल सत्कार करण्यात आला. संध्याकाळी साडेचार ते सात पर्यंत श्री साईबाबांच्या रथाची भव्य मिरवणूक निघाली, मुख्य दिवशी संध्याकाळी सात वाजता सुप्रसिद्ध भारूडकार श्री ह भ प त्रिंबकराव महाराज आम्ले, खेर्डेकर यांचा संगीत भारुडाचा सांप्रदायिक कार्यक्रम झाला. त्यांना मृदंग साथ पार्थापूर रत्न सुरेश महाराज अब्दल व स्वर साथ शामराव महाराज ताठे यांनी केली.
बुधवार १७ जुलै  रोजी सकाळी दहा ते बारा काल्याचे किर्तन झाले व नंतर दहीहंडी,साईबाबांची मध्यान्ह आरती व महाप्रसाद  आणि कार्यक्रमाची सांगता झाली.