💥परभणीचे कर्तव्यकठोर जि.पो.अधिक्षक उपाध्याय यांनी तात्काळ पाठवला अतिरिक्त पोलीस फोर्स💥


पालम/शहराच्या मुख्य चौकात आज बुधवार दि.१७ जुलै सायंकाळी रोजी ०७-०० वाजेच्या सुमारास युवकांच्या दोन गटात किरकोळ वादातून झालेल्या हाणामारी नंतर समाजकंठकांनी शहरातील खाजगी दुकानांसह शासकीय मालमता वाहणांना लक्ष बनवून मोठ्या प्रमाणात जाळपोळ दगडफेक करण्यास सुरुवात केल्याचे वृत्त असून या घटनेनंतर शहरातील मुख्य बाजारपेठ तातडीने बंद करण्यात आली असून समाजकंटकांनी मोठ्या प्रमाणात जमा होऊन शहरात दहशतीचे वातावरण तयार केल्याचे समजले आहे दरम्यान जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधिक्षक श्री.कृष्णकांत उपाध्याय यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन परभणी येथून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त पालमला पाठवला असून उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकृष्ण कर्डीले हे सुध्दा शहरात तळ ठोकून आहेत पोलीस प्रशासनासह शहरातील शांतताप्रिय नागरिकांकडून शहरात शांतता प्रस्थापित करण्याचा जोरदार प्रयत्न केला जात आहे.
पालम शहरात समाजकंठकांकडून विशेष म्हणजे बाजारपेठेतील अनेक दुकानांना लक्ष करण्यात आले असल्यामुळे खाजगी मालमत्तेसह शासकीय मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समजते अधिकृत नुकसानीचा आकडा हाती आला नसला तरी नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याचा समजते.मुख्य बाजारपेठ तसेच चौकातील दुचाकी-चारचाकी वाहनांनाही आगी लावण्याचेही प्रकार समाजकंठकांनी केले आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी कर्डीले यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील पालम शहरात दाखल झाले असून परिस्थितीवर संपूर्ण नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.दरम्यान या घटनेचे अधिक पडसाद उमटू नयेत याची दक्षता देखील घेतली जात असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.दरम्यान परिस्थिती नियंत्रणात असून शहरात तणावाचे वातावरण आहे.