🌟लोकनेत्या मा.ना.पंकजाताई मुंडे यांनी नियुक्ती पत्र देउन केले अभिनंदन🌟
परळी वैजनाथ (वार्ताहर) - आज दिनांक 01/05/2025 रोजी यशश्री निवास्थान, परळी वैजनाथ येथे लोकनेत्या महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री मा ना पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या सूचनेनुसार परळी वैजनाथ ग्रामीण तालुका अध्यक्ष म्हणून राजेश हरिश्चंद्र गित्ते यांची निवड करण्यात आली.
मा.ना.पंकजाताई मुंडे यांनी नियुक्ती पत्र देऊन राजेश गित्ते यांचे अभिनंदन केले नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष यांनी पक्षाच्या धोरणानुसार कार्य करून जनसेवा करण्याच्या सूचना मा. ना.पंकजाताई मुंडे यांनी दिल्या या प्रसंगी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष,तालुक्यातील सर्व जेष्ठ नेते पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते......
0 टिप्पण्या