🌟भारत पाकिस्तान संघर्षात पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कीला अमेरिका घातक क्षेपणास्त्र देणार....!


🌟अमेरीकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत विरोधी आकस पुन्हा स्पष्ट🌟

नवी दिल्ली : भारत पाकिस्तान संघर्षाच्या काळात भारता विरुद्ध लढण्यासाठी पाकिस्तानला सर्वतोपरी मदत करणाऱ्या तुर्की या देशाला घातक क्षेपणास्त्र विक्रीच्या प्रस्तावाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंजुरी दिली आहे. अमेरिका,तुर्की या देशांमध्ये या संदर्भात ३०४ दशलक्ष डॉलर्सचा करार करण्यात येणार आहे. कालच ट्रम्प यांनी ॲपल कंपनीने भारतात व्यवसाय करु नये असे आदेश ॲपल कंपनीला दिले होते.

जम्मू-काश्मीरमधील बैसरन येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी बेच्छुट गोळीबार करीत २६ निष्पाप पर्यटकांचा बळी घेतला होता. या घटनेनंतर भारत सरकारने पाकिस्तानकडून होणाऱ्या सतत दहशतवादी कारवायांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळे उध्वस्त केली. याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानकडून भारतातील सीमा भागात मिसाईल व ड्रोनने हमले करण्याचा प्रयत्न केला. अवघ्या दोन-तीन दिवसातच भारत-पाक या दोन देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातच पाकिस्तानकडून आलेला शस्त्रसंधीचा प्रस्ताव भारताने स्वीकारला. या संदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्वात आधी दोन देशात संधी घडवून आणण्यात यश आल्याचे द्विट केले होते. यानंतर भारतात अमेरिकेच्या मध्यस्थी बद्दल मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष काल सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असतांना त्याचा त्यांनी पुर्नउच्चार केला होता. पुन्हा काल ट्रम्प यांनी शस्त्रसंधीसाठी दोन्ही देशावर दबाव टाकल्याच्या वक्तव्यापासून घुमजाव केला. याच दरम्यान अॅपल मोबाईल कंपनीने भारतात गुंतवणूक थांबवावी, असे आदेश कंपनीच्या भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावादरम्यान, तुर्कीने उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिला. तुर्कीने शेकडो ड्रोन आणि लष्करी कर्मचारी पाठवून पाकिस्तानला तांत्रिक आणि धोरणात्मक मदत केली, ज्यामुळे भारतात तुर्कीविरुद्ध प्रचंड संताप निर्माण झाला. या रागाचा परिणाम सोशल मीडियावर दिसून आला. भारतात सध्या बायकॉट तुर्की ट्रेंड सुरु आहे. अनेक भारतीयांना ब्रुकीला पर्यटनासाठी जाणार नसल्याचे सांगितले. याचदरम्यान आता अमेरिका आणि तुर्कीच्या करारची चर्चा रंगली आहे. अमेरिकेने तुर्कीला ३०४ दशलक्ष डॉलर्स किमतीची क्षेपणास्त्रे विकण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला असताना आणि तुर्की उघडपणे पाकिस्तानला मदत करत असताना ही मंजुरी देण्यात आली. या क्षेपणास्त्र करारात तुर्कीसाठी हवेतून हवेत मारा करणारी HM-१२० - चठ--च क्षेपणास्त्रे समाविष्ट आहेत. यासोबतच, तुर्कीने २२५ दशलक्ष डॉलर्स किमतीची ५३ प्रगत मध्यम पल्लूयाच्या क्षेपणास्त्रांची आणि ७९.१ दशलक्ष डॉलर्स किमतीची ६० ब्लॉक सेकेंड क्षेपणास्त्रांची मागणी केली आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या