🌟नवी दिल्ली येथे अखिल भारतीय भिक्खू संघाच्या शिष्टमंडळाने घेतली केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांची भेट....!


🌟बुद्धगया येथील महाबोधी बुद्ध विहाराच्या विषयासंबंधी मार्ग काढण्याच्या दृष्टीने केली सखोल चर्चा🌟 

नवी दिल्ली :- नवी दिल्ली येथील 'पंचशील भवन' येथे अखिल भारतीय भिक्खू संघाच्या शिष्टमंडळाने दि.०३ मे २०२५ रोजी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत केंद्रीय कॅबिनेट मंत्री चिराग पासवान यांची भेट घेतली यावेळी अखिल भारतीय भिक्खू संघाच्या शिष्टमंडळाने कॅबिनेट मंत्री चिराग पासवान यांच्या सोबत बुद्धगया येथील महाबोधी बुद्ध विहाराच्या विषया संबंधी मार्ग काढण्याच्या दृष्टीने सखोल चर्चा केली.

 यावेळी शिष्टमंडळात संघनायक भदंत करुणानंद महाथेरो दिल्ली, अध्यक्ष भदंत डॉ.राहुल बोधी महाथेरो मुंबई,कार्याध्यक्ष भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो पुर्णा यांच्यासह समन्वयक मा.आर.आनंद दिल्ली यांची देखील आवर्जून उपस्थिती होती.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या