🌟राज्यस्तरीय चॉकबाल स्पर्धेसाठी परभणी जिल्ह्यातुन ०९ खेळाडुंची निवड.....!


🌟या संघाच्या व्यवस्थापक पदी अनिकेत भोसले तर प्रशिक्षक पदी सुधाकर पाईकराव यांची निवड🌟         

परभणी :- मुंबईतील ठाणे जिल्ह्यात वाशिंदा येथे दि.२३ मे ते २५ मे २०२५ रोजी संत गाडगेबाबा आश्रम शाळा भात सई येथे संपन्न होणाऱ्या पंधराव्या राज्यस्तरीय चॉकबॉल स्पर्धेसाठी परभणी जिल्ह्यातील ०९ खेळाडूंची निवड करण्यात आली.

पंधराव्या राज्यस्तरीय चॉकबॉल स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंमध्ये कर्णधार जानवी भाले,उपकर्णधार आरती भोसले, माही कऱ्हाळे,गौरी भोसले,प्रणाली हतागळे,पुर्वी डहाळे,स्नेहल भस्के, नंदिनी देवणे,अस्मिता मुर्गे या नऊ खेळाडुंचा समावेश आहे या संघाच्या व्यवस्थापक पदी अनिकेत भोसले तर प्रशिक्षक पदी सुधाकर पाईकराव यांची निवड करण्यात आली अशी माहिती जिल्हा सचिव सज्जन जयस्वाल यांनी दिली.........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या