🌟प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवलिंग बोधने यांचा राज्यस्तरीय शहीद भगतसिंग बेस्ट आंदोलक पुरस्काराने गौरव...!


🌟प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान🌟


परभणी
- प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने संताजी धनाजी कार्यकर्ता सन्मान २०२५ अंतर्गत राज्यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रहार जनशक्ती पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती दिनांक ११ मे २०२५ रोजी नांदेड येथे झालेल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या विभागीय मेळाव्यामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांना राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा शहीद भगतसिंग बेस्ट आंदोलक पुरस्कार जाहीर करण्यात आला व या वेळी पुरस्काराचे वितरण प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या हस्ते देण्यात आले.


शिवलिंग बोधने हे मागील तीस वर्षापासून राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असून प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून मागील दहा वर्षापासून जनतेच्या प्रश्नावर विविध आक्रमक व अनोखे आंदोलन करून संबंधित आंदोलन यशस्वी करून जनतेच्या प्रश्नावर न्याय मिळवून देण्याचे काम नेहमीच त्यांच्या मार्फत केली जाते. त्यांनी आजपर्यंत अनेक अनोखे लक्षवेधी व आक्रमक आंदोलने करून प्रशासनाचे जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. तसेच त्यांनी आजपर्यंत १०८ वेळा स्वच्छा रक्तदानही केलेले आहे. त्यांच्या याच अनोख्या आक्रमक व लक्षवेधी आंदोलनाची दखल प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने घेण्यात आली आणि त्यांना राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचे शहीद भगतसिंग बेस्ट आंदोलक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला. 

यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू, संताजी धनाजी सन्मान सोहळा अभियान प्रमुख महेशजी बडे, पक्ष निरीक्षक अमितजी ठाकूर, प्रहार जनशक्ती पक्षाचे नांदेड शहर जिल्हा प्रमुख प्रीतपाल सिंग साहू, जिल्हा प्रमुख विठ्ठल देशमुख,परभणी तालुका प्रमुख उद्धव गरुड, मानवत तालुकाप्रमुख माणिक राठोड, पाथरी तालुका प्रमुख दीपक खुडे, पालम तालुकाप्रमुख बळीराम इंगळे, वैभव संघई, पूर्णा तालुका प्रमुख शिवर सोनटक्के, शहर प्रमुख अंकुश गिरी, पूर्णा शहर प्रमुख संजय वाघमारे तसेच परभणी नांदेड व हिंगोली येथील प्रहार जनशक्ती पक्षाचे तथा प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या