🌟या स्पर्धेत स्वराली हिने “स्वच्छ भारत – सुंदर भारत” व “वैज्ञानिक दृष्टिकोन” या विषयावर आधारित चित्रांची निर्मिती केली🌟
हिंगोली – येथील ‘पोद्दार इंटरनॅशनल स्कूल’मध्ये शिकत असलेल्या कु. स्वराली विनोद चव्हाण हिने ‘डोंबिवली २०२५’ मध्ये आयोजित राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत भाग घेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे राज्य स्तरावर प्रथम क्रमांक पटकावून तिने राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी प्रवेश मिळवला होता.
या स्पर्धेत स्वराली हिने “स्वच्छ भारत – सुंदर भारत” व “वैज्ञानिक दृष्टिकोन” या विषयावर आधारित चित्रांची निर्मिती केली. तिच्या चित्रांचे संकलन, संकल्पना व सादरीकरण विशेष ठरले. राष्ट्रीय स्तरावर तीच्या चित्रांची निवड होऊन तिला मान्यवरांच्या हस्ते गोल्ड मेडल व प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले . शिक्षण क्षेत्रातील तिच्या या यशाबद्दल अखिल भारतीय राष्ट्रीय परिषद च्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष एम. एम. रहाटे, प्रसिद्ध शैक्षणिक लेखक प्रकाश ठाकूर,प्राचार्य अर्चना देशपांडे उप प्राचार्य व स्टाफ,सेवानिवृत्त विभागीय आयुक्त कृष्णा भोगे, हिंगोली येथील आकाशवाणी व दूरदर्शनचे सेवानिवृत्त प्रतिनिधी डॉ. विजय निलावार,ग्राहक पंचायत महाराष्ट्र चे जिल्हाध्यक्ष ऍड आर एन अग्रवाल,राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित एम एम राऊत, बाल संरक्षण समिती चे सदस्य परसराम हेंबाडे,विनोद व वैशाली चव्हाण,बालाजी राऊत,माजी प्राचार्य विक्रम जावळे,प्रकाश ठाकरे आदींनी तिचे विशेष कौतुक करून आशीर्वाद दिले आहेत..........
0 टिप्पण्या