🌟पुर्णा तालुक्यातील धनगर टाकळी येथील राष्ट्रमाता इंदिरा गांधी स्मारक हायस्कूलने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली....!


🌟मुख्याध्यापक डी.सी.डुकरे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले जात आहे🌟

पुर्णा :- पुर्णा तालुक्यातील धनगर टाकळी येथील राष्ट्रमाता इंदिरा गांधी स्मारक हायस्कूलचा मार्च-२०२५ मध्ये पार पडलेल्या एसएससी बोर्ड परीक्षेचा एकूण निकाल ८२ टक्के लागला असून कु. कार्तिकी साखरे या विद्यार्थ्यांनीने ८४.४०% गुण घेऊन सर्वप्रथम आली आहे तर कु.दिपाली ठाकूर व कु.अनुजा काकडे या दोन्ही विद्यार्थिनींना ७९.८०% गुण घेऊन द्वितीय क्रमांक मिळवला आहे. सोहम खानापूरकरने ७५.४० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे शाळेचे प्रथम श्रेणी २३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. द्वितीय श्रेणीत ३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तृतीय श्रेणीत १९ विद्यार्थी पास झाले आहेत. 

        या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे गोदावरी शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री रामकिशन रौंदळे,सचिव श्री दशरथ साखरे,संस्थेचे सर्व सन्माननीय संचालक मंडळ व पदाधिकारी,शाळेचे मुख्याध्यापक श्री डी.सी.डुकरे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले जात आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या