🌟दहावीच्या निकालात दरवर्षीप्रमाणे मुलींच अव्वल ; मुलींचीच बाजी ; मुलीच प्रथम क्रमांकावर....!


🌟राज्याचा दहावीचा निकाल 94.10 टक्के ; कोकण विभाग नेहमी प्रमाणे प्रथम क्रमांकावर🌟

✍️ मोहन चौकेकर

राज्याचा दहावीचा निकाल 94.10 टक्के लागला आहे. यंदाही कोकण विभाग अव्वल असून यंदा दहावीच्या निकालात नागपूर विभाग तळाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली असून उत्तीर्ण झालेलल्या मुलींची टक्केवारी 96.14 अशी आहे, तर मुलांची टक्केवारी 92.21 अशी आहे.

💫निकालाची विभागनिहाय टक्केवारी :-

*पुणे  : 94.81 टक्के 

*नागपूर : 90.78 टक्के

*संभाजीनगर : 92.82 टक्के

*मुंबई : 95.84 टक्के

*कोल्हापूर : 96.78 टक्के

*अमरावती : 92.95 टक्के

*नाशिक : 93.04 टक्के

*लातूर : 92.77 टक्के

*कोकण : 99.82 टक्के

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा दर वर्षीच्या तुलनेत 10 दिवस लवकर घेतल्या. निकालही 15 मेपूर्वी जाहीर करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार, बारावीचा निकाल 5 मे रोजी जाहीर करण्यात आला. यंदाच्या दहावीच्या परीक्षेसाठी 23 हजार 492 माध्यमिक शाळांतून 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये आठ लाख 64 हजार 120 मुले, तर सात लाख 47 हजार 471 मुली आहेत.

तसेच 19 तृतीयपंथीयांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. दहावीच्या निकालात यंदाही कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागात 98.82 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. तर, सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला. नागपूर विभागात 90.78 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. राज्याच्या दहावीच्या परीक्षेत मुलींची कामगिरी सरस ठरली आहे. राज्यात 96.14 टक्के विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या आहेत. तर, 92.21 टक्के मुलं विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात 211 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. 

✍️ मोहन चौकेकर*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या