🌟सोनपेठ येथे भव्य वीर माहेश्वर व बाल संस्कार शिबिरास सुरुवात....!


🌟महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून 30 वीर माहेश्वर बालके या शिबिरासाठी दाखल🌟 


सोनपेठ (दि.०८ मे २०२५)
:- श्री गुरु नंदिकेश्वर मठ संस्थान सोनपेठ येथे प्रति वर्षा प्रमाणे याही वर्षी वर्ष आठवे भव्य वीर माहेश्वर व बाल संस्कार शिबिरास सुरुवात दिनांक 1 मे 2025 गुरुवार रोजी करण्यात आली.

महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून 30 वीर माहेश्वर बालके या शिबिरासाठी दाखल झाली असून श्री गुरु नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या सानिध्यात पुरोहित यशवंत शास्त्री स्वामी, अथर्व जंगम कोल्हापूर, नागेश स्वामी व रतिकांत स्वामी आदीजन परिश्रम घेत आहेत, ज्या सदभक्तांना या वीर माहेश्वर बाल संस्कार शिबिरास अन्नदान अथवा पूरक गोष्टीची सेवा समर्पित करावयाची असल्यास दात्यांनी श्री गुरु नंदकिशोर मठ संस्थांनास संपर्क साधावा मोबाईल 76 66 64 10 88, निजु नका जागा जागा, आपल्या स्वधर्माने वागा, वेद शास्त्र इतिहास, हाची करिती उपदेशाप्रमाणे बालमनावर धर्मरूपी संस्कार घडवण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिराचा समारोप दिनांक 30 मे 2025 शुक्रवार रोजी होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या