🌟पत्रकारांच्या काम करण्याच्या पद्धतीची घेतलेली दखल व निलमताईचीं माणुसकी🌟
✍️ मोहन चौकेकर
विधानपरिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे यांची कार्यतत्परता, पत्रकारांच्या काम करण्याच्या पद्धतीची घेतलेली दखल व माणुसकी हि निश्चितच वाखाणण्याजोगी आहे.संभाजीनगर येथे 16 मे रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना महिला आघाडीचा प्रचंड असा मोठा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला प्रमुख अतिथी व मार्गदर्शन करण्यासाठी विधानपरिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे या संभाजीनगर येथे आल्या होत्या.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनाच्या संभाजीनगरमध्ये महिला आघाडीच्या मेळाव्याला प्रचंड असा महिलांचा प्रतिसाद मिळाला होता व या कार्यक्रमाला महिलांची खुप मोठी गर्दी जमलेली होती. विधानपरिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे यांनी यावेळी आपल्या तडफदार व अतिशय सुंदर अश्या भाषणात महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले होते. विधानपरिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे यांनी यावेळी बोलताना आरक्षण मिळाले म्हणून नव्हे तर आपल्यामध्ये असलेल्या क्षमतांमुळे आपण पुढे आलो आहोत हे सिद्ध करणेही तितकेच गरजेचे आहे असे म्हटले होते तसेच महिलांच्या आर्थिक सामाजिक आणि राजकीय सक्षमीकरणाबाबत अनेक योजनांची माहिती या वेळी उपस्थित महिलांना दिली होती. 1 जुन ते 30 जुन दरम्यान संभाजीनगर जिल्ह्यांमध्ये महिलांसाठी आरोग्य शिबीर घेण्यात येणार असल्याचे सांगितले होते. महिला बचत गटांना व्यवसाय निवडीपासून उत्पादन विक्रीसाठी सर्व टप्प्यांवर सरकारतर्फे सर्व प्रकारचे प्रशिक्षण व सहाय्य दिले जाईल असे सांगितले होते. या महिला आघाडीच्या कार्यक्रमाची बातमी मी पत्रकार या नात्याने घेतली व आमच्या अजित न्यूज हेडलाईन्स या वेब पोर्टलवर ती बातमी लावली छापली. त्यानंतर मी हि आमच्या अजित न्यूज हेडलाईन्स या वेब पोर्टलवर घेतलेली बातमी विधानपरिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे यांना त्यांच्या मोबाईल नंबर वर एक औपचारिकता म्हणून पाठवली.परंतु त्यानंतर एक आश्चर्याची व नवलाईची घटना अशी घडली की विधानपरिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे यांनी त्यांच्या दिवसभर असलेल्या अत्यंत बिझी शेड्युल मधुन , दिवसभर असलेल्या अत्यंत व्यस्त असलेल्या कार्यक्रमातुन अमुल्य वेळातुन वेळ काढून मला बातमी घेतल्याबद्दल आभार असा मेसेजने WhatsApp व्हाॅटस ॲप वर रिप्लाय दिला त्यामुळे मला खूप मोठा आश्चर्याचा व नवलाईचा धक्का बसला व त्यामुळे मीच त्यानंतर विधानपरिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे यांना निलमताई तुम्ही तुमच्या अत्यंत बिझी शेड्युल मधुन , अमुल्य अश्या वेळातुन वेळ काढून मी तुमची बातमी घेतली त्यासाठी माझे आभार मानले या बद्दल मीच आपणास धन्यवाद म्हणतो मीच आपला आभारी आहे आपलाच पत्रकार मोहन चौकेकर असा मेसेज पाठवला . विधानपरिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे यांच्या संभाजीनगर मध्ये झालेल्या महिला आघाडीच्या मेळाव्याची बातमी मी पत्रकार नात्याने घेतली व आमच्या अजित न्यूज हेडलाईन्स या वेब पोर्टलवर घेतलेली बातमी विधानपरिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे यांना त्यांच्या मोबाईल नंबर वर WhatsApp वर पाठवली त्या नंतर स्वतः निलमताईनीं मला आभार असा WhatsApp व्हाट्स ॲप वर आभार मेसेज रिप्लाय दिला या विधानपरिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे यांच्या कृतीतुन काम करण्याच्या पद्धतीतुन विधानपरिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे यांची कार्यतत्परता पत्रकारांच्या काम करण्याच्या पद्धतीची घेतलेली दखल व निलमताईचीं माणुसकी हि निश्चितच वाखाणण्याजोगी आहे व या त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीतुन व या सर्व गोष्टींमुळेच निलमताई राजकारणात विधानपरिषदेच्या उपसभापती सारख्या मोठ्या पदावर पोहचल्या असेच दिसुन येते......
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या