🌟शेतकऱ्यांची कर्जमाफी,शेतमालाला हमीभाव व दिव्यांगांना ६ हजार मानधन मिळावे यासाठी केले आंदोलन🌟
परभणी - महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकी अगोदर संपूर्ण कर्जमाफी देण्याचे जे आश्वासन दिले होते ते आश्वासन पूर्ण करावे व राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करून त्यांचा सातबारा कोरा करावा, शेतीमालाची खरेदी ही हमीभावानेच व्हावी आणि जे व्यापारी हमीभावाने शेतीमाल खरेदी करणार नाहीत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी तसेच दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन मिळावे या मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने माजी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती चे औचित्य साधून आज रोजी महाराष्ट्रातील सर्व मंत्री व राज्यमंत्र्यांच्या घरासमोर रक्तदान आंदोलन घेण्यात येत आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या रक्तदान आंदोलना प्रमाणेच आज रोजी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रहार जनशक्ती पक्ष परभणीच्या वतीने परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. मेघनादीदी बोर्डीकर यांच्या घरासमोर रक्तदान आंदोलन घेण्यात आले या रक्तदान शिबिरात २६ जणांनी स्वेच्छा रक्तदान केले. यावेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.
यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, उपजिल्हाप्रमुख रामेश्वर जाधव, परभणी तालुकाप्रमुख उद्धव गरुड, पाथरी तालुका प्रमुख दीपक खुडे, सोनपेठ तालुकाप्रमुख अशोक मस्के, पूर्णा शहर प्रमुख संजय वाघमारे, परभणी शहर प्रमुख अंकुश गिरी, शहरचिटणीस वैभव संघई, केशव जाधव, सिद्धेश्वर आगलावे, पवन जोगदंड यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते........
0 टिप्पण्या