🌟पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या लक्षात घेता राज्य गृह विभागाचा निर्णय🌟
🌟पोलीस हेड कॉन्स्टेबल हा पदवीधर असावा या अटी-शर्तीनुसार परवानगी🌟
मुंबई :- महाराष्ट्र राज्यातील वाढत्या गुन्हेगारीला जलदगतीने आळा घालण्यासाठी राज्यातील गृह विभागाने महत्वपूर्ण निर्णय घेतला असून आता कुठल्याही गुन्ह्यांचे सर्वार्थाने तपास करण्याचे अधिकार हेड कॉन्स्टेबला देण्यात आले आहेत.
महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या लक्षात घेता राज्य गृह विभागाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून यामुळे गुन्ह्यांची उकल जलदगतीने होण्यास मदत होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे दरम्यान राज्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांतही वाढ झाली आहे. परंतु पोलीस दलातील अपुऱ्या मनुष्यबळामुळे गुन्ह्यांचा तपास करण्यात अडचणी येत होत्या त्यामुळे गुन्ह्यांची उकल करण्यातही विलंब होत होता. पोलिसांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी पोलीस खात्यात भरती करण्याची मागणी गृह विभागाकडे सातत्याने करण्यात येत आहे. अखेर वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासह गुन्ह्यांची उकल जलदगतीने करण्यासाठी हेड कॉन्स्टेबलला गुन्ह्यांचा तपास करण्याचा अधिकार देण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे याआधी गुन्ह्यांचा तपास करण्याचे अधिकार पोलीस उपनिरीक्षक पदापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांना होता. आता पोलीस वरिष्ठ हवालदार यांनादेखील गुन्ह्याचा तपास करता येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून याबाबतच्या आदेशाचे राजपत्र जारी करण्यात आले आहे.
💫पोलीस हेड कॉन्स्टेबल हा पदवीधर असावा या अटी-शर्तीनुसार परवानगी :-
पोलीस हेड कॉन्स्टेबल हा पदवीधर असावा, त्यांनी ७ वर्षे सेवा पूर्ण केलेली असावी. तसेच गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय, नाशिक येथील ६ आठवड्याचे विशेष प्रशिक्षण पूर्ण व परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे राहणार आहे
0 टिप्पण्या