🌟घराचे हस्तांतरण करण्याकरीता दहा हजार रुपयांची लाच स्विकारतांना लिपिकासह ऑपरेटरही रंगेहाथ ताब्यात🌟
परभणी/पुर्णा : परभणी जिल्ह्यातील पुर्णा नगर परिषदेत लिपिक व ऑपरेटर पदावर कार्यरत दोन लाचखोर कर्मचाऱ्यांनी वडिलांच्या संमतीपत्राच्या आधारे घराचे हस्तांतरण करण्याकरीता संबंधित तक्रारदाराला दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती सदरील लाचेची दहा हजार रुपयांची रक्कम स्विकारतांना पुर्णा नगर परिषदेतील लिपिक नरहरी गोमाजी सातपुते याच्यासह कंत्राटी संगणक ऑपरेटर रत्नदीप श्रीरंग वाघमारे या दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या एका पथकाने आज मंगळवार दि.१३ मे २०२५ रोजी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.
एका तक्रारदार नागरीकाने त्यांच्या वडीलाचे संमतीपत्राच्या आधारे घराचे हस्तांतरण त्यांचे व भावाचे नावे करण्याकरीता ०७ मे २०२५ रोजी रितसर अर्ज व कागदपत्रे पुर्णा नगर परिषदेत सादर केली तेथील लिपीक नरहरी सातपुते यांची भेट घेवून त्या संबंधीची कल्पना दिली परंतु, सातपुते यांनी हस्तांतराच्या कामाकरीता १० हजार रुपये द्यावे लागतील असे स्पष्ट केले लाच द्यावयाची इच्छा नसल्याने संबंधित नागरीकाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली या खात्याच्या पथकाने या तक्रारीची ०८ मे २०२५ रोजी पंचासमक्ष पडताळणी केली तेव्हा लिपीक नरहरी सातपुते याने लाच रक्कम १० हजार रुपये स्विकारण्याची सहमती दर्शविली.
दरम्यान, या खात्याच्या पथकाने मंगळवारी पंचासमक्ष सापळा रचला, तेव्हा लिपीक नरहरी सातपुते यांनी सांगितल्याप्रमाणे कंत्राटी संगणक ऑपरेटर रत्नदीप वाघमारे हा १० हजार रुपयांची लाच स्विकारतांना पकडला गेला. या खात्याच्या पथकाने लगेचच सातपुते यासही ताब्यात घेतले. या दोघांची अंगझडती घेतली असता एक-एक मोबाईल जप्त करण्यात आला. दरम्यान, या दोघांच्याही घरांची झडतीची प्रक्रिया सुरु होती. पूर्णा पोलिस ठाण्यात या प्रकरणात त्या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्याचीही प्रक्रिया सुरु होती. दरम्यान, पोलिस अधिक्षक संदीप पालवे, अप्पर पोलिस अधिक्षक डॉ. संजय तुंगार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधिक्षक अशोक इप्पर, पोलिस निरिक्षक बसवेश्वर जक्कीकोरे यांच्या नेतृत्वाखाली सापळा पथकातील पोलिस निरीक्षक अलताफ मुलानी, सीमा चाटे, अतूल कदम, शेख जिब्राईल, शाम बोधणकर, कल्याण नागरगोजे, कदम, नरवाडे यांनी या कारवाईत सहभाग नोंदविला......
0 टिप्पण्या