🌟मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांना भोवळ : बीड दौरा अर्धवट सोडून छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात दाखल🌟
✍️ मोहन चौकेकर
1) सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांचा निकाल जाहीर! आदिती तटकरेंचा महिला व बालविकास विभाग अव्वल, तर चंद्रपूरचे जिल्हाधिकारी नंबर 1, उल्हासनगरचे आयुक्त पहिल्या क्रमांकावर ; सामान्य प्रशासन, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण आणि नगर विकास हे 3 विभाग तळाला, राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या निकालात या विभागांचा ढिसाळ कारभार
2) भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला, दोन युद्धांची साक्षीदार आयएनएस विक्रांत संपूर्ण ताफ्यासह अरबी समुद्रात दाखल ; पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशाला सायबर युद्धाचा अलर्ट; 23 एप्रिलनंतर भारतावर जवळपास 10 लाख सायबर हल्ले, महाराष्ट्राच्या सायबर सेलची माहिती
3) शेवटी शरद पवारांना हिंदू धर्माला शरण जावंच लागलं जितेंद्र आव्हाडांच्या संकल्पनेतील तुळजा भवानी मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेतील हजेरीवरुन मनसे नेते प्रकाश महाजन यांचा खोचक टोला ; खोटे अन् फेक अकाऊंट काढून ट्रोलिंग; जागरुकतेसाठी कडक कायदा गरजेचं, मंत्री पंकजा मुंडे यांचं बीडमध्ये वक्तव्य
4) मी निवडून आलो असतो तर एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्री झाले असते; शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शहाजीबापू पाटलांनी सांगितलं लॉजिक, उद्धव ठाकरेंवरही टीका
5) आमचं सरकार निर्णय घेताना विरोधकांना विचारत नाही, रावसाहेब दानवेंचा राहुल गांधींना टोला, संजय राऊतांवरही निशाणा ; जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार आता गप्प का बसलेत? मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सवाल ; काँग्रेसचं अधिवेशन बोलवा आणि मोदींच्या अभिनंदनाचा ठराव घ्या, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची मागणी, म्हणाले, नेहरु गांधींनी लोकांचा विचार केला नाही
6) महाराष्ट्र दिनी रायगडमध्ये झेंडावंदनाचा मान मंत्री अदिती तटकरेंनांचं, तर मंत्री भरत गोगावलेंनी महाड शहरातील चांदे क्रीडांगणावर केलं ध्वजवंदन ; मंत्री भरत गोगावलेंवर सातत्याने अन्याय, रायगडचे पालकमंत्री गोगावलेच व्हावेत हीच आमची इच्छा, शिवसेनेच्या आमदारांची आग्रही मागणी
7) मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांना भोवळ, बीड दौरा अर्धवट सोडून छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात दाखल ; कांदा काढणीला निघालेल्या मजुरांचा पिकअप पलटला, 3 महिला ठार 15 जखमी, बीडच्या आष्टी तालुक्यात भीषण अपघात
8) ज्यांच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या करतात, तेही अतिरेकीच; आता मरायचे नाही, जाब विचारायचा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टींचा सरकारवर हल्लाबोल ; परकीय शत्रूपासून मोठा त्रास वाढणार, ऑगस्टमध्ये नुकसान करणारा पाऊस, बुलढाण्यातील जिल्ह्यातील भेंडवळच्या घटमांडणीत वर्तवले धक्कादायक अंदाज
9) शरद पवारांमुळे आमचा जीएसटीचा प्रश्न अवघ्या 10 सेकंदात सुटला, तत्कालीन केंद्रीय मंत्री अरुण जेटलींसोबतच्या बैठकीचा किस्सा सांगत अभिनेते परेश रावल यांनी केलं कौतुक ; सूरजचे फॅन्स गावाकडे आहेत आणि गावांमध्ये चित्रपटगृह नाहीत, त्याने चित्रपटात क्षमतेपेक्षा सुंदर काम केलंय, झापुक झुपूक चित्रपटावर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकरची प्रतिक्रिया
10) आयसीसीची मोठी घोषणा! 2026 महिला टी-20 वर्ल्ड कपच्या तारखा जाहीर, 24 दिवस इंग्लंडमधील सहा ठिकाणी रंगणार थरार
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या