🌟यावर्षी मान्सून वेळेत येणार असल्याचे याआधीच हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला होता🌟
मुंबई :- महाराष्ट्र राज्यात मागील काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने जोरदार धुमाकूळ घेतल्याचे निदर्शनास येत असून या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे शेतातील पिकांसह फळबागांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले पुढील चार दिवस देखील राज्यातील अनेक भागांमध्ये वादळी पाऊस बरसेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
देशासह महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे यावर्षी मान्सून वेळेत येणार असल्याचे याआधीच हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला होता. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सूनपूर्व पाऊस राज्यात आणि देशातील अनेक भागात सक्रीय झाला आहे. पुढील पाच दिवसांसाठी महाराष्ट्रासह देशातील काही भागात वादळी वारे आणि पाऊस कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. यावेळी मान्सूनपूर्व पावसामुळे सुमारे ५० मिमी पाऊस पडला आहे. हे यापूर्वी २००० च्या दशकात घडले होते. जर आपण २०२१ बद्दल बोललो नाही, जेव्हा तौक्ते चक्रीवादळामुळे २३० मिमी पाऊस पडला होता, तर यावेळी पाऊस खूप मुसळधार आहे. १ मार्चपासून आयएमडीच्या (भारतीय हवामान विभाग) कुलाबा आणि सांताक्रूझ वेधशाळांनी अनुक्रमे ६२.८ मिमी आणि ३८.४ मिमी पावसाची नोंद केली आहे. काल रात्री नांदेडमध्ये मुसळधार पावसासह जोरदार सुसाट वादळी वारे होते. पहाटे पावसाने विश्रांती घेतली असली तरी आज दिवसभर नांदेड शहरात उन्ह आणि ढगाळ वातावरण त्यासोबत प्रचंड उकाडा नांदेडकरांना जाणवला.
0 टिप्पण्या