🌟अन्यथा काम बंद बेमुदत उपोषणाचा इशारा🌟
पुर्णा (दि.०७ मे २०२५) - महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना तालुका कृषी अधिकारी कार्यालय पूर्णा कार्यालयाच्या समोर सर्व कृषी सहाय्यक यांनी त्यांच्या विविध हक्काच्या न्याय मागण्यांसाठी धरणे आंदोलन केले.
याप्रसंगी धरणे आंदोलनासाठी उपस्थित तालुका अध्यक्ष धृपती विखे, जिल्हा संघटक सुरेश काळे, तालुका सचिव ज्ञानेश्वर तिडके, उपाध्यक्ष तुकाराम कदम, महिला संघटक सुलोचना म्हात्रे, अनुजा भोसकर, सत्यभामा जोंधळे, योगिता अंभोरे, सृष्टी अंभोरे, छाया लोखंडे, पुरुष संघटक आणि संघटनेचे पुरुष संघटक सर्व कृषी सहाय्यक सचिन रणेर, विजय अवचार, शिवप्रसाद भोसले, हनुमान मोरे, तोटावाड सर्व कृषी सहाय्यक उपस्थित होते. यामध्ये कृषी सहायकचे पदनाम बदलून सहायक कृषी अधिकारी करणे, कृषी सहायकांना लॅपटॉप देणे, कृषी सेवक कालावधी रद्द करण्यात यावा, कृषी विभागच्या आकृती बांधमध्ये कृषी सहायकांना योग्य तो न्याय देण्यात यावा, निविष्टा वाटपामध्ये कृषी सहायकावर होणारा अन्याय दूर करण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. अन्यथा बेमुदत काम बंद करण्यात येईल असा इशारा कृषी सहायक संगठना पूर्णा यांच्या वतीने दै. सामनाशी बोलताना सांगीतले........
--
0 टिप्पण्या