🌟ऑपरेशन 'सिंदूर'ची माहिती देणाऱ्याला हरयाणातून अटक🌟
चंदीगड : भारतात दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणाऱ्या शत्रुराष्ट्र पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या देशद्रोही गद्दारांना कालकोठडीची हवा दाखवण्याचे महत्वपूर्ण कार्य भारतीय सुरक्षा दलासह पोलिसांनी केले आहे भारत-पाकिस्तान मधील तणावाच्या पार्श्वभूमीवर हरियाणा राज्यातील कैथलमध्ये एका पाकिस्तानी गुप्तहेराला पकडण्यात आले. पाकिस्तानच्या लष्कराला आणि आयएसआय या गुप्तचर संस्थेला 'ऑपरेशन सिंदूर' बाबत माहिती पुरवल्याचे त्याने कबूल केले आहे. कैथल जिल्ह्यातील मस्तगढ चिका गावातील या २५ वर्षीय देशद्रोही गद्दार गुप्तहेराचे नाव देवेंद्र सिंह असे असून तो डिप्लोमाचा विद्यार्थी आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' या अत्यंत गोपनीय लष्करी मोहिमेची माहिती पाकिस्तानला पुरवल्याचे त्याने कबूल केले आहे. याबाबत कैथलचे डीएसपी वीरभान यांनी सांगितले की गुप्त माहितीच्या आधारे आम्ही विशेष पथक तयार करून त्याला ताब्यात घेतले प्राथमिक तपासात त्याने ऑपरेशन सिंदूरविषयीची माहिती पाकिस्तानला दिल्याचे उघड झाले आहे.देवेंद्रकडून जप्त केलेल्या मोबाइल, लॅपटॉप आणि इतर डिजिटल उपकरणांचा सायबर पोलिसांचे पथक तपास करत आहे. मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. देवेंद्र सिंह हा पंजाबमधील एका महाविद्यालयात एमए (राजकारणशास्त्र) चा विद्यार्थी होता. नोव्हेंबर २०२४ मध्ये तो नानकाना साहिब गुरुद्वारा येथे गेला होता, त्यावेळी त्याची पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या एजंटांसोबत ओळख झाली. तेव्हापासून तो त्यांच्या संपर्कात होता हरयाणा आणि पंजाबमधून पाकिस्तानला माहिती पुरवण्याचे प्रकार वाढत असताना ही घटना उघडकीस आली आहे.
यापूर्वी, २४ वर्षीय नौमन इलाही याला हरियाणातील पानिपत येथे पाकिस्तानला संवेदनशील माहिती पाठवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. अमृतसरमधील लष्करी आस्थापनांची माहिती पाकिस्तानला पाठवल्याच्या आरोपाखाली पंजाब पोलिसांनी पलक शेर मसीह आणि सूरज मसीह यांनाही अटक केली होती.......
0 टिप्पण्या