🌟केंद्र सरकारचे 'साथी' पोर्टल राज्यातही शेतमाल,किड व्यवस्थापन अंतर पिकाची शेतकऱ्यांना मिळणार चॅटबॉटवर माहिती🌟
मुंबई : महाराष्ट्र राज्यात बोगस बियाणांची विक्री रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या साथी पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक करण्यात येणार आहे यामुळे बोगस बियाणांची विक्री कुठे झाली हे याचा पोर्टलच्या माध्यमातून शोध घेता येणार आहे. केंद्र सरकारने साथी पोर्टल राज्यात वापरण्यास परवानगी दिली असून लवकरच हे पोर्टल उपलब्ध होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच पावसाचा अलर्ट शेतकऱ्यांना आधीच मिळणार असून शेतमाल, किड व्यवस्थापन अंतर पिक याची अद्ययावत माहिती शेतकऱ्यांना चॅटबॉट वर उपलब्ध होणार असल्याचे ते म्हणाले. राज्यातील खरीप हंगाम २०२५ २६ ची राज्यस्तरीय बैठकीचे नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात केले होते. त्यानंतर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या ऋणाबंधू सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, मंत्री गिरीश महाजन आदी उपस्थित होते.
यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. समाधान-कारक पाऊस बरसला तर शेतीच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे बोगस बियाणे खरेदीपासून फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या साथी पोर्टलची मदत घ्यावी, असे आवाहन फडणवीस यांनी शेतकऱ्यांना केले आहे......
0 टिप्पण्या