🌟परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार दि.१९ मे रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन....!


🌟जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली महिला लोकशाही दिनाचे आयोजन🌟 

परभणी : परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दि.१९ मे २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले असून याकरीता संबंधीत समितीचे सदस्य व शासन निर्णयात नमूद संबंधित विभागाचे अधिकारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

            समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्‍न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन त्यांना न्याय मिळावा तसेच समाजातील त्यांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. या सोमवारी आयोजित केलेल्या या महिला लोकशाही दिनी जिल्ह्यातील समस्याग्रस्त व पीडित महिलांनी महिलांनी त्यांच्या वैयक्तिक स्वरूपाच्या तक्रारी विहीत नमुन्यात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, परभणी यांच्या कार्यालयात दाखल करण्यात याव्यात, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या