🌟बुद्ध धम्म प्रचार आणि प्रसारासाठी आपण आपलं सर्व आयुष्य समर्पित केल आहे🌟
मराठवाड्यामध्ये महाराष्ट्र मध्ये बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेलं धम्मचक्र गतिमान करण्यामध्ये आपला व आपल्या कुटुंबाचा मोलाचा वाटा आहे शील सदाचार विचाराला कृतीची जोड निर्मोही निर्विकार असलेल आपलं व्यक्तिमत्व प्रत्येकालाच भावतं दिवंगत धम्म सेनानि जी.एस. दादा कांबळे त्यांच्या कुशल व समर्थ नेतृत्वाखाली सुरू केलेला धम्म प्रचार व प्रसाराचा कारवा प्रत्येक बहुजनाच्या घरामध्ये पोहोचला आहे.
आपल समस्त जीवन आणि कार्य मानवतेसाठी प्रेरणादायी अशा स्वरूपाच आहे राज्यस्तरीय विद्रोही कार्यकर्ता या पुरस्काराने कर्मवीर एडवोकेट एकनाथराव आव्हाड त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त आपण हा पुरस्कार दिनांक 24 मे 2025 रोजी आंबेजोगाई या ठिकाणी प्राध्यापक डॉ. मिलिंद आवाड यांच्या हस्ते विनम्रपणे स्वीकारणार आहात कर्मवीर एकनाथ आवा ड धम्म सेनानी जीएस दादा कांबळे बुद्ध धम्म प्रचारासाठी आयुष्य समर्पित करणारे उद्योगपती हनुमंतराव उपरे हे आपल्या मध्ये नाहीत.
परंतु त्यांच्या धम्मकार्याचा सुगंध आस मंत आजही दरवळत आहे त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपल्यासारखी काया वाच्या मनाने समर्पित भावनेने धम्माला वाहून घेतलेले धम्मशील व्यक्तिमत्व समाजाचे भूषण आहे आपल्याविषयी सार्थ अभिमान आहे....!
शुभेच्छुक
श्रीकांत हिवाळे
माजी तालुकाध्यक्ष
भारतीय बौद्ध महासभा पूर्णा जिल्हा परभणी.
0 टिप्पण्या