🌟समृद्धी महामार्गावर मेहकर येथील डॉ श्रावण शिंगणे कुटुंबाला संभाजीनगर जवळ लुटले.....!


🌟या घटनेत डॉ.श्रावण शिंगणे कुटुंबाचा  11 लाख रुपयांचा ऐवज  लंपास🌟

✍️ मोहन चौकेकर

नागपूर मुंबई या समृद्धी महामार्गावर काल रात्री संभाजीनगर परिसरात चार दरोडेखोरांनी, एका कुटुंबाला लुटले असून त्यांच्या जवळील अकरा लाख रुपयाच्या किमतींचे सोन्या चांदीचे दागिने लुटून ते पसार झाल्याची घटना घडली मेहकर येथून डॉ.श्रावण शिंगणे डॉ.चैताली आणि श्रीमती निंबोरे हे आपल्या चार चाकी वाहनाने पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे निघाले होते.

काल रात्री दहा साडेदहाच्या सुमारास त्यांची गाडी संभाजीनगर चिकलठाणा परिसरात आली असता त्यांच्या गाडी पुढे एका पांढऱ्या स्कोडा गाडीतून आलेल्या चार दरोडेखोरांनी त्यांची गाडी रोखली आणि त्यांच्या जवळील अकरा लाख बारा हजार रुपये किमतीचे सोने चांदी दागिने लुटले. या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देऊन हे लुटेरे पसार झाले. या घटनेची माहिती ही करमाडा पोलीस स्टेशनला दिल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवलेली आहे याबाबत पोलीस निरीक्षक श्रीनिवास धुळे हे अधिक तपास करीत आहे. सदरहू घटनेने समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये घबराहट पसरलेली आहे. या महामार्गावर प्रवासी सुरक्षेची व्यवस्था कमकुवत असल्याचे निदर्शनास येते..........

✍️ *मोहन चौकेकर*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या