🌟परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाकडून पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा होणार गुणगौरव.....!


🌟त्यामुळे जास्तीत जास्त पत्रकार मित्रांनी त्यांच्या पाल्यांच्या गुणपत्रीका, फोटोसह संपर्क साधावा🌟

परभणी :- परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने जिल्ह्यातील पत्रकारांच्या पाल्यांचा गुणगौरव सोहळा आयेाजित करण्यात आला आहे. इयत्ता दहावी व बारावी तसंच अन्य परिक्षांमध्ये ज्या पाल्यांनी नेत्रदिपक यश मिळविले आहे अशा पाल्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील पत्रकार तसेच वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक व डिजीटल मिडीयामध्ये काम करणार्‍या सर्व पत्रकार व वितरक बांधवांच्या पाल्यांचा गुणगोरव करण्यासाठी परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. इयत्ता दहावी, बारावी व अन्य परिक्षांमध्ये आपल्या परिश्रमातून यश संपादन केलेल्या पाल्यांचा गुणगौरव व्हावा, त्यांना अधिक चालना मिळावी यासाठी जिल्हा मराठी पत्रकार संघाकडून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. दहावी, बारावी व  अन्य परिक्षेत यशस्वी झालेल्या पत्रकारांच्या पाल्यांनी आपल्या मार्कमेमोसह परभणी जिल्हा पत्रकार संघाशी संपर्क साधावा, असे आवाहन पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रभू दिपके यांनी केले आहे. गुणवंत विद्यार्थ्यांनी पत्रकारसंघाचे कार्याध्यक्ष लक्ष्मण मानोलीकर, कोषध्यक्ष मोईन खान, प्रसिध्दीप्रमुख सुधाकर श्रीखंडे यांच्याशी गुणपत्रीकेच्या झेरॉक्स आणि पासपोर्ट साईज फोटो सह 25 मे पर्यंत संपर्क साधावा.  परभणी जिल्हा मराठी पत्रकारसंघाच्या वतीने एका विशेष समारंभात मान्यवरांच्याहस्ते या पाल्यांचा व त्यांच्या पालकांचा गुणगौरव करण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पत्रकार मित्रांनी त्यांच्या पाल्यांच्या गुणपत्रीका, फोटोसह संपर्क साधावा असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस प्राचार्य सुरेश नाईकवाडे, मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रभू दिपके, कार्याध्यक्ष लक्ष्मण मानोलीकर यांनी केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या