🌟जम्मू कश्मीर राज्यातील पहलगाम हल्ल्यातील धर्मांध दहशतवादी अजूनही बेपत्ता......!


🌟दहशतवाद्यांकडून हल्ल्यापूर्वी आठ दिवसापासून परिसराची रेकी ; ऐनवेळी बैसरनची निवड🌟

श्रीनगर : काश्मीरमधील पहलगाम जिल्ह्यातील बैसरन हल्ल्यातील दहशतवाद्यांचा तपास यंत्रणांना अजूनही सुगावा लागला नाही मात्र तपासात अतिरेकी हल्ल्याच्या आठ दिवस अगोदरपासून परिसराची रेकी करीत होते. ऐनवेळी प्लॅन बदलून बैसरनची निवड करण्यात आल्याचे एनआयएच्या तपासात स्पष्ट झाले आहे.

काश्मीरमधील बैसरन येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २८ पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा यंत्रणा कश्मीर परिसरात शोध मोहीम जोमाने सुरु केली आहे. अजूनपर्यंत या अतिरेक्यांचा सुगावा तपास यंत्रणांना लागला नाही. परंतु बैसरन ही दहशतवाद्यांचा पहिला पर्याय नव्हता. त्यांना पहलगाम भागातील अरु व्हॅली, अॅम्युझमेंट पार्क किंवा बेताब व्हॅलीमध्ये ही रक्तरंजित खेळ खेळायचा होता. परंतु सुरक्षा दलांची उपस्थिती, सुरक्षित सुटकेचे कमी पर्याय आणि कमी गर्दी असल्यामुळे त्यांनी आपला विचार बदलला, अशी माहिती यंत्रणांच्या तपासात पुढे आली आहे. हे दहशतवादी पहलगाम आणि त्याच्या आसपासच्या भागात सात दिवसांपासून फिरत होते. हल्ल्याच्या फक्त दोन दिवस आधी त्यांनी बैसरनची निवड केली. बैसरन हल्ला प्रकरणाच्या तपासादरम्यान मिळालेल्या सुगावांच्या आधारे आणि दहशतवाद्यांच्या ओव्हरग्राउंड वर्कर्सच्या चौकशीच्या आधारे ही माहिती समोर आली आहे. हल्ल्यापूर्वी सात दिवसांत दहशतवाद्यांनी अरु व्हॅलीची रेकी केली, परंतु सुरक्षा दलांचा कॅम्प जवळ असल्याने त्यांनी तो निर्णय बदलला. यानंतर, दहशतवाद्यांनी अरु व्हॅली रस्त्यावरील लिद्दर नदीच्या काठावर असलेल्या अम्युझमेंट पार्कला निवडले होते. परंतु, तेथे गर्दी नसल्याने आणि सुरक्षा दलांच्या उपस्थितीमुळे तसेच जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या भीतीमुळे त्यांनी आपला विचार बदलला. त्यांनी बेताब खोऱ्याची रेकी देखील केली परंतु सुरक्षा दलांच्या उपस्थितीमुळे आणि सुटकेचे पुरेसे मार्ग नसल्यामुळे तोही प्लॅन रद्द केला. हल्ल्यानंतर त्यांना कुठे पोहोचायचे आहे याची माहिती दहशतवाद्यांच्या एका ओव्हरग्राउंड वर्करने फोनवरून दिली होती. या तपासणीत एका अल्ट्रा-स्टेट कम्युनिकेशन डिव्हाइसमधून दोन सिग्नल देखील आढळले. या उपकरणांद्वारे, ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉलसाठी सिम कार्डशिवाय मोबाईल फोन कनेक्ट करता येतो आणि संदेश पाठवता येतात. ज्या भागात हे सिग्नल आढळले त्या भागाची कसून तपासणी करण्यात आली आहे आणि तपास सुरू आहे.........


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या