🌟नांदेड दक्षिण मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापकांनी केला नांदेड ते परळी रेल्वे मार्गावर तपासणी दौरा....!


🌟यावेळी भविष्यातील सुरक्षा व कार्यक्षमतेच्या दृष्टीने संबंधित अधिकारी/कर्मचाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या🌟

नांदेड : नांदेड दक्षिण मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक प्रदीप कामले यांनी आज शुक्रवार दि.०९ मे रोजी नांदेड-परळी रेल्वे लोहमार्गांवर तपासणी दौरा केला या दौऱ्यात विविध पायाभूत सुविधांचा विभागीय व्यवस्थापक श्री कामले यांच्याकडून आढावा घेण्यात आला आणि भविष्यातील सुरक्षा व कार्यक्षमतेच्या दृष्टीने संबंधित अधिकारी/कर्मचाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या .

नांदेड-परळी दरम्यान रेल्वे लोहमार्गावर तपासणी खिडकीतून सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक अशा विविध संरचना,वळणे,ब्रिजेस व सिग्नल यांची बारकाईने पाहणी करण्यात आली परभणी आणि गंगाखेड रेल्वे स्थानकांचा विकास अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत करण्यात येत आहे. या  रेल्वे स्थानकावरील पुनर्विकास कार्याचा आढावा घेतला आणि उपस्थित अधिकार्यांना सूचना केल्या . 

      परळी ते वडगाव निळा स्थानकांदरम्यान दरम्यान लेव्हल क्रॉसिंग गेट क्र. 24A , गंगाखेड-पोखर्णी नृसिंह स्थानकांदरम्यान पूल क्र. 28 आणि वडगाव निळा–गंगाखेड जवळील वळण क्र. 17 आणि गंगाखेड स्टेशनयार्ड आशा संरचनांची तपासणी करून त्यांची सध्याची स्थिती आणि देखभाल कार्यांची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. प्रदीप कामले  यांनी गंगाखेड रेल्वे   स्टेशन येथील रिले रूम आणि  स्टेशन विकास कार्याची पाहणी केली. तसेच वडगाव निळा रेल्वे स्थानकाची तपासणी केली ज्यात त्यांनी तेथील रिले रूम, ट्रेक्शन सब स्टेशन (TSS) यांची पाहणी केली. या नंतर प्रदीप कामळे यांनी परभणी  रेल्वे स्थानकाची तपासणी केली.  यात त्यांनी स्टेशन मास्तर कार्यालयाची तपासणी केली. प्रीमियम पार्किंग, स्टेशन विकास कार्य, प्रवासी सुविधा यांची पाहणी केली. 

 या दौऱ्यात वरिष्ठ विभागीय अभियंता पी. सी. रुद्र मूर्ति. वरिष्ठ विभागीय सिग्नल आणि टेलिकॉम अभियंता पी. सुरेश, उप मुख्य अभियंता निमजे, वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता ए. रवी तेजा,  विभागीय विद्युत अभियंता सोभन बाबू,  सहायक वाणिज्य अधिकारी श्रीनिवास सूर्यवंशी, गिरीश कुमार, सहायक सिग्नल आणि टेलिकॉम अभियंता आदी हे अधिकारी उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या